-
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. तितकीच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.
-
ऐश्वर्या राय बच्चनचा मोठा चाहतावर्ग आहे. ती पॅरिस फॅशन वीकसाठी पॅरिसला गेली आहे.
-
आता या कार्यक्रमातील ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय रॅम्प वॉक करताना दिसत आहे.
-
तसेच तिचे काही फोटोदेखील पाहायला मिळत आहे.
-
यावेळी तिने तिच्या वेगळ्या अंदाजात चाहत्यांची मने जिंकली. तिने रॅम्पवर नमस्कार करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
यावेळी तिने काळ्या रंगाची पॅन्ट आणि त्याच रंगाचे ब्लेजर परिधान केले होते.
-
तिचा हा अंदाज चाहत्यांना आवडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ आणि फोटोंवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे.
-
अनेकांनी तिला देवी म्हटले, अनेकांनी क्वीन म्हटले तर काहींनी ऐश्वर्याइतके सुंदर कोणी असूच शकत नाही, असे म्हणत कौतुक केले.
-
आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (फोटो सौजन्य: ऐश्वर्या राय फॅन पेज इन्स्टाग्राम)
ऐश्वर्या राय बच्चनचा पॅरिस फॅशन वीकमधील लूक चर्चेत; तुम्ही ‘हे’ फोटो पाहिलेत का?
Paris Fashion Week Aishwarya Rai Photos: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने जिंकली चाहत्यांची मने
Web Title: Aishwarya rai bachchan look of paris fashion week see photos nsp