-
महाराष्ट्राची ‘फुलवंती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीचं कर्जतमध्ये आलिशान फार्महाऊस आहे. निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या कुशीत सुंदर असं फार्महाऊस असावं अशी प्राजक्ताची अनेक वर्षांपासूनची इच्छा यानिमित्ताने पूर्ण झाली.
-
प्राजक्ता अनेकदा आपल्या कुटुंबीयांसह निवांत वेळ घालवण्यासाठी फार्महाऊसवर जात असते. याशिवाय महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकार देखील सगळे एकत्र प्राजक्ताच्या फार्महाऊसवर एन्जॉय करण्यासाठी गेले होते. याठिकाणी कुटुंबीय व हास्यजत्रेच्या कलाकारांसह प्राजक्ताने तिचा वाढदिवस साजरा केला होता.
-
प्राजक्ता माळीचं फार्महाऊस सुंदर व्ह्यू, मोठ्या खोल्या, ओपन स्विमिंग पूल, आकर्षक फर्निचर अशा सुखसोयींनी परिपूर्ण आहे. अभिनेत्रीच्या फार्महाऊसचं नाव ‘प्राजक्तकुंज’ असं आहे.
-
प्राजक्ता माळीच्या या आलिशान फार्महाऊसला नुकतीच एका लोकप्रिय अभिनेत्रीने भेट दिली.
-
अभिनेत्री सायली देवधर आपल्या कुटुंबीयांसह ‘प्राजक्तकुंज’ या फार्महाऊसवर गेली होती. याठिकाणचे फोटो सायलीने सोशल मीडियावर शेअर करत प्राजक्ताला टॅग सुद्धा केलं आहे.
-
सायलीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या संपूर्ण कुटुंबाची झलक पाहायला मिळत आहे.
-
सायली अनुभव सांगत लिहिते, “प्राजक्तकुंज येथे राहण्याचा अनुभव खूपच छान होता. सुंदर दृश्य, अतिशय प्रशस्त व्हिला, अप्रतिम जेवण आणि आदरातिथ्य…थँक्यू! प्राजक्ता आता लवकरच एकत्र पुन्हा फार्महाऊसला जाण्याचं प्लॅनिंग करूयात.”
-
सायलीची ही पोस्ट रिशेअर करत प्राजक्ता लिहिते, “Hey Darling अखेर तू आमच्या प्राजक्तकुंजला भेट दिलीस…खूप छान वाटलं.”
-
दरम्यान, सायली देवधरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेने जवळपास ३ वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर २०२४ च्या अखेरिस सर्वांचा निरोप घेतला. ( सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी व सायली देवधर इन्स्टाग्राम )
प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसला कुणी दिली भेट? फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…
Web Title: Star pravah actress sayali deodhar visited prajakta mali karjat farmhouse shares photos and experience sva 00