-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
-
सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. याशिवाय तिच्या आयुष्यातल्या अनेक अपडेट्सही देत असते.
-
अशातच अश्विनीने सोशल मीडियावर शेतीकाम करतानाचे काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्याबद्दल तिचं कौतुकही होत आहे.
-
“हे फक्त फोटो नाहीत तर यात भावना आहेत” अशी कॅप्शन देत अश्विनीने शेतातले फोटो शेअर केले आहेत.
-
शेतात राबल्यामुळे अभिनेत्री थकली असली; तरी या फोटोंमधून तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आणि निखळ आनंद पाहायला मिळत आहे.
-
अभिनेत्रीच्या या साधेपणाचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. ‘रॉयल शेतकरीण’ आणि ‘शेतकऱ्याची लेक’ असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे.
-
“अभिनेत्री असूनही मदत म्हणून शेतात काम करतेस हेच तुझं मोठेपण आहे”, “अभिनयातील ग्लॅमरसह मातीशी नाळ जोडलेली तुमची ही बाजू खूप प्रेरणादायक आहे”
-
तसंच “आभाळाला हात टेकून सुद्धा आपल्या काळ्या आईशी असलेले नाते घट्ट ठेवणारी आमची ताई”, या अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, अश्विनीच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर अश्विनी पुन्हा स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
शेतकऱ्याची लेक! भर उन्हात शेतात राबतेय स्टार प्रवाहवरील लोकप्रिय अभिनेत्री; चाहत्यांकडून साधेपणाचं कौतुक
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचे शेतात काम करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; चाहत्यांकडून कौतुक
Web Title: Star pravah marathi actress ashwini mahangade shares photos of farming work ssm 00