-
दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलीवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आपल्या धाकट्या सुनेसह या पार्टीला आल्या होत्या.
-
नीता अंबानी यांनी दिवाळी पार्टीला मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली सिल्व्हर सिक्विन साडी नेसली होती.
-
नीता अंबानी या साडीत खूपच सुंदर दिसत होत्या. यावेळी त्यांनी सुंदर Heart-Shaped कानातले घातले होते. याशिवाय त्यांच्या हातात डायमंड ब्रेसलेट सुद्धा होतं.
-
नीता अंबानींच्या या सुंदर लूकचे फोटो मनीष मल्होत्राने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यांची धाकटी सून राधिका सुद्धा खूपच सुंदर दिसत होती.
-
नीता अंबानी या पार्टीला साडीवर मॅचिंग अशी खास बॅग घेऊन पोहोचल्या होत्या. सध्या नीता अंबानींच्या लूकसह ही छोटी बॅग चर्चेचा विषय ठरली आहे.
-
नीता अंबानी ‘हर्मेस केलीमॉर्फोज बिर्किन’ ( Hermès Birkin ) ही स्पेशल एडिशनची बॅग घेऊन मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाल्या होत्या.
-
नीता अंबानींची ही स्पेशल बॅग १८ कॅरेट व्हाइट गोल्डपासून बनवण्यात आली आहे. ही जगातील सर्वात महागडी बॅग आहे.
-
या बॅगची किंमत १,७७०,३०० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांनुसार जवळपास १५ कोटी इतकी आहे.
-
सध्या सोशल मीडियावर सर्वत्र नीता अंबानींच्या या महागड्या बॅगेची चर्चा होत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : मनीष मल्होत्रा इन्स्टाग्राम व विरल भय्यानी इन्स्टाग्राम )
जगातील सर्वात महागडी बॅग घेऊन नीता अंबानी पोहोचल्या दिवाळी पार्टीला! किंमत आहे तब्बल…; आकडा ऐकून थक्क व्हाल
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत नीता अंबानींची चर्चा, त्यांच्या बॅगेची किंमत माहितीये का? जाणून घ्या…
Web Title: Nita ambani silver saree look for diwali party carries worlds most expensive bag worth 15 crore sva 00