-
‘स्टार प्रवाह’च्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या लोकप्रिय मालिकेत झळकलेली अभिनेत्री अमृता माळवदकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
-
अमृताच्या लग्नसोहळ्यातील सुंदर फोटो तिच्या मित्रमंडळींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अमृता माळवदकरने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमाचा लेखक विनायक पुरुषोत्तमशी लग्न केलं आहे.
-
निखिल बने, स्वानंदी बेर्डे, निमिष कुलकर्णी, आकांशा गाडे असे बरेच कलाकार अमृता- विनायकच्या हळदीला व लग्नसोहळ्याला उपस्थित होते.
-
विनायक आणि अमृताने लग्न लागताना पारंपरिक लूक केला होता.
-
सुंदर लाल रंगाची साडी, नाकात नथ, हातात हिरवा चुडा, गळ्यात नाजूक हार या लूकमध्ये अमृता फारच सुंदर दिसत होती.
-
अमृता व विनायक यांच्यावर संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
अमृता व विनायक यांचा लग्नसोहळा साध्या व मराठमोळ्या संस्कृतीनुसार पार पडला. त्यामुळे नेटकऱ्यांनी या दोघांचं विशेष कौतुक केलं आहे.
-
या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अमृता आजवर अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. तर, विनायक पुरुषोत्तमला हास्यजत्रेमुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. ( सर्व फोटो सौजन्य : अमृता माळवदकर इन्स्टाग्राम अकाऊंट )
‘कोण होतीस तू…’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! तिचा पती आहे तरी कोण? ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’शी आहे खास कनेक्शन
स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत झळकलेली अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, पाहा तिच्या लग्नाचे सुंदर फोटो…
Web Title: Star pravah actress amruta malwadkar married with maharashtrachi hasyajatra writer vinayak purushottam see photos sva 00