-

‘ठरलं तर मग’ मालिकेत अस्मिताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका दबाडेला यंदा मार्च महिन्यात मुलगी झाली.
-
लाडक्या लेकीचं नाव मोनिकाने वृंदा असं ठेवलं आहे.
-
मोनिकाने यापूर्वी लेकीच्या बारशाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. मात्र, गेली ७ महिने अभिनेत्रीने एकाही फोटोमध्ये वृंदाचा फेस रिव्हिल केला नव्हता.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर सुद्धा मोनिका कायम वृंदाला घेऊन जायची. पण, कोणीच वृंदाचा फोटो कुठेही शेअर केला नव्हता. काही दिवसांपूर्वीच एका व्हिडीओमध्ये मोनिकाने दिवाळी पाडव्याला लेकीचा चेहरा रिव्हिल करणार असल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं.
-
यानुसार दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मोनिका दबाडेने तिच्या चिमुकल्या लेकीची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर केली.
-
मोनिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये चिमुकली वृंदा खूपच क्युट दिसत आहे.
-
याशिवाय अभिनेत्रीने वृंदाचं खास फोटोशूट सुद्धा करून घेतलं आहे. यामध्ये वृंदाने बेबी पिंक रंगाचा ड्रेस घातल्याचं पाहायला मिळतंय.
-
वृंदाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच मराठी कलाकारांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
-
रेश्मा शिंदेने “खूपच गोड” अशी कमेंट या फोटोंवर केली आहे. तर, प्राजक्ता दिघेंनी यावर “So cute” अशी कमेंट केली आहे. सुकन्या मोनेंनी वृंदाला पाहताच “आई गं किती गोड” अशी प्रतिक्रिया दिली आहे. यांच्यासह समृद्धी केळकर, सीमा घोगळे, केतकी पालव, अभिषेक रहाळकर, किशोरी अंबिये, सुप्रिया पाठारे या सगळ्यांनीच वृंदाला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : मोनिका दबाडे व @photoart_by_priyanka इन्स्टाग्राम )
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने अखेर दाखवला चिमुकल्या लेकीचा चेहरा! वृंदा दिसते खूपच गोड, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स…
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीच्या लेकीला पाहिलंत का? मोनिका दबाडेने शेअर केला वृंदाचा पहिला फोटो…
Web Title: Tharala tar mag fame monika dabade reveals baby girl face shares glimpses from latest photoshoot sva 00