-

‘स्ट्रीट डान्सर ३ डी’, ‘हाउसफुल ५’, ‘बागी ४’ या आणि अशा अनेक बॉलीवूड सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे सोनम बाजवा.
-
सोनमनं हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषांमधूनही आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. सोनम सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
-
अशातच सोनमनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत किसिंग आणि बोल्ड सीनमुळे सिनेमे नाकारल्याचा आता पश्चाताप होतोय, असं मत व्यक्त केलं.
-
“मी काही बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या होत्या, कारण मला वाटायचं, पंजाबमधील लोकांना हे चालेल का? आपल्याकडे चित्रपट कुटुंबाबरोबर पाहिले जातात; त्यामुळे मला याची भीती वाटायची.
-
“मला सतत वाटायचं की, लोक काय म्हणतील? माझ्या कुटुंबीयांना काय वाटेल? लोक काय विचार करतील? हे फक्त अभिनयासाठी आहे; हे घरच्यांना समजेल का? अशा अनेक प्रश्नांनी मी गोंधळले होते.”
-
“बोल्ड अन् किसिंग सीनबाबत मी आई-वडिलांशी बोलले, तर त्यांनी ‘हे चित्रपटासाठी आहे, तर आमची काही हरकत नाही’ असं म्हटलं. मला त्यांना विचारायला लाज वाटत होती, पण त्यांनी सहज स्वीकारलं.”
-
दरम्यान, सोनम ही सध्याची बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘बेस्ट ऑफ लक’ या पंजाबी चित्रपटातून तिने अभिनयात पदार्पण केलं.
-
‘पंजाब १९८४’ या चित्रपटामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नंतर २०१९ मध्ये आलेल्या ‘बाला’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
सोनम बाजवाचा नुकताच ‘एक दीवाने की दीवानियत’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात तिची अभिनेता हर्षवर्धन राणेबरोबर मुख्य भूमिका आहे.
किसिंग आणि बोल्ड सीनमुळे सिनेमे नाकारल्याचा प्रसिद्ध अभिनेत्रीला होतोय पश्चाताप; म्हणाली…
“बोल्ड सीनमुळे सिनेमे नाकारले, पण…”, बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत; म्हणाली…
Web Title: Sonam bajwa regret over rejecting films due to bold scenes ssm 00