-

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या नवीन घरात प्रवेश केला.
-
आता तिने मंदिरात पूजा करतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
भाग्यश्री मोटेने १६ सोमवारच्या व्रताचे उद्यापन केले.
-
तिने आईबरोबर मंदिरात विधिवत पूजा केली.
-
पूजेतील काही फोटो भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.
-
१६ सोमवार उद्यापन! या पूजेच्या माध्यमातून मी अनेक जुन्या गोष्टी मागे सोडतेय आणि मनात साठवून ठेवलेल्या अनेक गोष्टींचा शेवट करतेय, असं कॅप्शन भाग्यश्री मोटेने या फोटोंना दिलं आहे.
-
भाग्यश्री मोटेच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
बहिणीचं निधन, साखरपुडा मोडणं या सारख्या कठीण काळातून भाग्यश्री मोटे आता नवी सुरुवात करतीये.
-
नवीन घर घेतल्यावर आता तिने १६ सोमवारच्या व्रताचे उद्यापन केले.
-
सर्व फोटो – भाग्यश्री मोटे इन्स्टाग्राम
मराठी अभिनेत्रीने केलं १६ सोमवारच्या व्रताचं उद्यापन, आईसह केली पूजा; फोटो शेअर करत म्हणाली…
Bhagyashree Mote 16 Somvar Udyapan : मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने पूजेतील काही खास फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Bhagyashree mote 16 somvar udyapan actress performed pooja with mother see photos hrc