-
ऑफिसचे काम, सामाजिक-कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्या दबावामुळे चिंताग्रस्त-तणाव वाटणे स्वाभाविक आहे, पण तुम्हाला अनेकदा असे वाटते का?
-
प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीचा ताण घेणे किंवा सतत चिंताग्रस्त राहणे हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
-
तणाव किंवा चिंतेची ही समस्या वेळीच आटोक्यात आणली नाही, तर त्यामुळे नैराश्याचा धोकाही वाढतो. त्यामुळेच, जर तुम्हालाही लहान लहान गोष्टींचा ताण येत असेल, तर वेळीच सावध व्हा.
-
आरोग्य तज्ञ म्हणतात, अनेक गोष्टींमुळे चिंता वाटू शकते. त्यामुळे समस्या ओळखून ती दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
-
काही लोकांमध्ये अनुवांशिकतःच चिंता वाढण्याचा धोका असू शकतो. अशा लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.
-
चिंता वाढवणारी कारणे ओळखा आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. परंतु तरीही तुम्हाला फरक जाणवत नसेल, तर यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची अवश्य मदत घ्या.
-
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक सवयी आपली चिंता वाढवू शकतात. या सवयींपासूनही स्वतःचा बचाव करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया चिंता कमी करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात?
-
अनेक अभ्यासातून समोर आले आहे की ज्या लोकांना रात्री चांगली झोप मिळत नाही ते इतर लोकांच्या तुलनेत अधिक चिंताग्रस्त असतात. यामुळेच प्रत्येकाला दररोज किमान ७-८ तासांची झोप घेण्याचा सल्ला दिला जातो.
-
झोपल्यामुळे आपल्या शरीराला आणि मनाला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळतो. यामुळे तुम्ही तुमच्या चिंतेवर मात करू शकता. चिंतेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे.
-
बर्याचदा आपल्याला वाटते की कॉफी आणि चहाच्या सेवनाने तणाव कमी होतो. परंतु अनेक अभ्यासात त्यांना हानिकारक आणि समस्याप्रधान मानले गेले आहे.
-
एक कप कॉफी किंवा चहा प्यायल्याने तुम्हाला काही काळ ताजेतवाने वाटू शकते, परंतु त्याचा अतिरेक समस्या वाढवूही शकतो.
-
जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी घेतल्याने चिडचिड आणि मळमळ होण्याची समस्या वाढू शकते. मात्र यामुळे काही लोकांमध्ये चिंताही वाढू शकते.
-
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जे लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात त्यांना चिंता आणि तणावाचे विकार होण्याची शक्यता इतर लोकांपेक्षा जास्त असते.
-
सोशल मीडियावर अनेक वेळा तुम्हाला अशा पोस्ट दिसतात ज्यामुळे तुमची काळजी वाढू शकते.
-
त्यामुळे तुम्हाला चिंता वाटत असेल तर सोशल मीडियापासून थोडे अंतर ठेवा. असे केल्याने तुम्ही तुमचा ताण आणि चिंता कमी करू शकता.
-
गतिहीन जीवनशैली तुमच्यासाठी शारीरिक आणि मानसिक अशा अनेक प्रकारे समस्या निर्माण करू शकते. पूर्णपणे निष्क्रिय शरीर तुमच्या समस्यांना चालना देऊ शकते.
-
शारीरिक व्यायाम केल्याने चिंतेची लक्षणे कमी होण्यास मदत होते. म्हणूनच जर तुम्हाला सतत चिंता वाटत असेल, तर नियमित व्यायामाची सवय लावा.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Pexels)
Mental Health Day 2022 : ‘या’ सामान्य सवयींमुळे बिघडतंय आपलं मानसिक स्वास्थ्य; वेळीच करा बदल
तणाव किंवा चिंतेची समस्या वेळीच आटोक्यात आणली नाही, तर त्यामुळे नैराश्याचा धोकाही वाढतो. त्यामुळेच, जर तुम्हालाही लहान लहान गोष्टींचा ताण येत असेल, तर वेळीच सावध व्हा.
Web Title: Our mental health is deteriorating due to these common habits make the change today pvp