• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these common habits are major cause of increased risk of stroke make the change today pvp

Photos : ‘या’ सामान्य सवयी ठरतात स्ट्रोकचा धोका वाढण्याचे मोठे कारण; आजच करा बदल

आज आपण स्ट्रोकचा धोका वाढण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या वाईट जीवनशैलीच्या सवयींबद्दल जाणून घेऊया.

October 30, 2022 17:10 IST
Follow Us
  • cause of increased risk of stroke
    1/12

    अनेक अहवलांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतात दर मिनिटाला एका व्यक्तीचा स्ट्रोकमुळे मृत्यू होतो. खराब जीवनशैली आणि काही वाईट सवयींमुळे ही समस्या उद्भवू शकते.

  • 2/12

    स्ट्रोक म्हणजेच पक्षाघात ही आज एक सामान्य समस्या बनली आहे. मोठ्या संख्येने तरुण याच्या विळख्यात येत आहेत.

  • 3/12

    वैद्यकीय भाषेत, जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा खंडित होतो, तेव्हा ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते.

  • 4/12

    या स्थितीत मेंदूचे नुकसान किंवा पक्षाघाताचा धोका असतो. आज आपण स्ट्रोकचा धोका वाढण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या वाईट जीवनशैलीच्या सवयींबद्दल जाणून घेऊया.

  • 5/12

    चुकीचे खानपान किंवा आहारातील पोषक तत्त्वांची कमतरता यांचा परिणाम शरीरावर अनेक प्रकारे दिसून येतो, त्यापैकी एक म्हणजे पक्षाघाताची घटना.

  • 6/12

    सॅच्युरेटेड फॅट, मीठ, ट्रान्स फॅट आणि उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण यामुळे शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थेत अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

  • 7/12

    मद्यपान हे एक असे व्यसन आहे जे व्यक्तीला हळूहळू मृत्यूच्या दाढेत ढकलू शकते.

  • 8/12

    अतिप्रमाणात केलेल्या मद्यपानामुळे शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांचे नुकसान होते. तसेच, यामुळे पक्षाघाताचा धोकाही कायम राहतो.

  • 9/12

    शारीरिक क्रियाशील नसल्यामुळे शरीर अनेक गंभीर आजारांचे घर बनू शकते. त्यामुळेच नियमित व्यायाम न करणाऱ्यांनी व्यायाम करण्याची सवय लावून स्वतःला फिट ठेवावे.

  • 10/12

    भारतात तंबाखूशी संबंधित वस्तूंचे उत्पादन आणि सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तंबाखू हे केवळ पक्षाघाताचेच नाही तर कर्करोगाचेही प्रमुख कारण आहे.

  • 11/12

    तंबाखूमुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि अशावेळी शरीरात रक्तदाबाची समस्या वाढते.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Pexels/Freepik)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: These common habits are major cause of increased risk of stroke make the change today pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.