-
Heart Attack Early Symptoms: सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धांत वीरचं आज वयाच्या ४६ व्या वर्षी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले.
-
यापूर्वीही कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जिममध्येच व्यायाम करताना कार्डियाक अरेस्ट आला होता, महिनाभर मृत्यूला झुंज देऊन अखेरीस श्रीवास्तव यांचे निधन झाले होते.
-
काही दिवसांपूर्वी साऊथ कोरिया येथे हॅलोविन पार्टीत सुद्धा चेंगराचेंगरी दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने तब्बल ५० जणांचे दुर्दैवी निधन झाले होते.
-
यावरून अनेकांना आता हृदय विकाराच्या संबंधित प्रश्न पडू लागले आहेत. आज आपण शरीरात हार्ट अटॅकचे लवकर दिसणारे संकेत पाहणार आहोत.
-
हार्टअटॅक येण्याआधी शरीरातील काही अववयवांना नेहमीपेक्षा खूप जास्त घाम फुटतो.
-
हार्टअटॅकच्या वेळी येणारा घाम हा मुख्यतः मान, गळा व चेहऱ्यावर ओठांच्या अवतीभोवती येऊ लागतो.
-
मेयो क्लिनिकच्या मते, हृदयविकाराच्या झटक्यामुळे छातीत १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ दुखणे जाणवू शकते. मात्र हार्ट अटॅक येण्याआधीही महिनाभर छातीत कळ येण्याची तक्रार जाणवू शकते.
-
हृदयविकाराचा झटका येण्याआधी चक्कर येण्याचा त्रास उद्भवू शकतो.
-
हृदयविकाराचा झटका येण्याआधी काही दिवस छातीत सतत धडधडणे, जीव घाबरल्यासारखा होणे असे त्रास जाणवू शकतात.
-
सतत थकवा जाणवणे, झोप येणे हे सुद्धा हृदयविकाराशी संबंधित अपायकारक लक्षण आहे.
-
हृदयविकाराचा झटका येण्याआधी काही दिवस छातीत सतत धडधडणे, जीव घाबरल्यासारखा होणे असे त्रास जाणवू शकतात.
-
अनेकांना धाप लागणे, दम लागणे असे त्रास जाणवतात. मात्र वारंवार श्वास घेण्यात अडचण येत असल्यास हृदयविकाराशी संबंधित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.
Heart Attack च्या महिन्याभर आधी शरीर देतं ‘हे’ संकेत; छातीत दुखणेच नव्हे तर ‘ही’ लक्षणेही ओळखा
Heart Attack Early Symptoms: सिद्धांत वीर सूर्यवंशी, राजू श्रीवत्सव, या कलाकारांचे मागील काही काळात हार्ट अटॅकने निधन झाले आहे. आरोग्याची इतकी काळजी घेणाऱ्या कलाकरांनाच अशाप्रकारे आजाराने विळखा घातल्यामुळे सामन्यांच्या मनातही चिंता निर्माण झाली आहे.
Web Title: Siddhant vir suryavanshi heart attack early symptoms body changes in a month before heart disease svs