• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. want to get rid of uric acid problem so think carefully before consuming these foods cholesterol heart issue body pain pvp

Photos: युरिक अ‍ॅसिडच्या समस्येपासून सुटका करायची आहे? मग ‘या’ पदार्थांचे सेवन करण्याआधी नीट विचार करा

युरिक अ‍ॅसिडची लक्षणे काय आहेत आणि या रुग्णांनी कोणत्या पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे ते जाणून घेऊया.

December 6, 2022 12:28 IST
Follow Us
  • uric acid
    1/12

    युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढणे ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. ही समस्या ५० वर्षे अधिक वयाच्या लोकांमध्ये जास्त दिसून येते. मात्र खराब आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हा आजार आता कमी वयाच्या लोकांना देखील होत चालला आहे.

  • 2/12

    यूरिक अ‍ॅसिड हे शरीरात तयार होणारे एकप्रकारचे विष आहे, यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यूरिक अ‍ॅसिड वाढण्यासाठी आहारातील प्युरिनयुक्त पदार्थ कारणीभूत ठरतात.

  • 3/12

    युरिक अ‍ॅसिडची लक्षणे काय आहेत आणि या रुग्णांनी कोणत्या पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे ते जाणून घेऊया.

  • 4/12

    जर तुम्हाला सांधेदुखी असेल आणि तुम्हाला उठताना आणि बसण्यात अडचण येत असेल, तर ते युरिक अ‍ॅसिडचे मुख्य लक्षण आहे. याशिवाय बोटांना सूज येणे हे देखील युरिक अ‍ॅसिड वाढण्याचे लक्षण आहे.

  • 5/12

    तसेच, जर तुमच्या सांध्यांमध्ये गाठी तयार होत असतील तर तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे. म्हणून या रुग्णांनी आपल्या आहारात पुढील पदार्थाचा समावेश करण्यास प्रतिबंध करायला हवा.

  • 6/12

    सॉफ्ट ड्रिंक्समध्ये मोठ्याप्रमाणावर साखरेचा वापर केला जातो. यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिडची समस्या वाढू शकते. आधीच या समस्येचा सामना करत असलेल्या रुग्णांसाठी जास्त साखरेचे सेवन करणे अपायकारक ठरू शकते. म्हणूनच युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करू नये.

  • 7/12

    काही प्रकारच्या सीफूडकधीही प्युरिन आढळते. ट्यूना, सॅल्मन आणि ट्राउट यांसारख्या माशांमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढू शकते आणि हे किडनी निकामी होण्यास कारणीभूत ठरू शकते.

  • 8/12

    अल्कोहोलमध्ये प्युरीन आढळते. म्हणूनच मद्यपान केल्याने शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढू शकते. अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की बिअरमध्ये जास्तीत जास्त प्युरीन असते. म्हणूनच यूरिक अ‍ॅसिडच्या आजाराने ग्रस्त असलेल्यांनी ते टाळावे.

  • 9/12

    लाल मांस यूरिक अ‍ॅसिडची समस्या वाढवू शकते. यामध्ये मोठ्याप्रमाणावर प्युरीन आढळते. म्हणूनच दीर्घकाळापासून लाल माणसाचे सेवन करणाऱ्या लोकांच्या रक्तामध्ये हा घटक जमा होत राहतो. यामुळे स्टोन आणि संधिवात यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.

  • 10/12

    फ्लॉवर, पालक आणि मशरूम यासारख्या भाज्याही यूरिक अ‍ॅसिडचा धोका वाढवू शकतात. ते वर नमूद केलेल्या पदार्थांप्रमाणे यूरिक अ‍ॅसिड वाढवत नसले तरीही ते हानिकारक आहेत. त्यामुळे या आजाराने त्रस्त असलेल्यांनी या भाज्यांचे सेवन संतुलित प्रमाणात करावे.

  • 11/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

  • 12/12

    सर्व फोटो: Freepik

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Want to get rid of uric acid problem so think carefully before consuming these foods cholesterol heart issue body pain pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.