• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. avoid eating white bread for breakfast white bread can cause constipation obesity stomach diabetes heart disease pdb

Health Tips: तुम्ही नाश्त्यात रोज खाताय ‘हा’ पदार्थ, आजच टाळा खाणं; नाहीतर गंभीर आजारांचा करावा लागेल सामना

बहुतेक लोक त्यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ‘या’ पदार्थाचे सेवन करतात. हे आजच टाळा, नाहीतर तुम्हाला करावा लागेल गंभीर आजारांचा सामना.

December 22, 2022 09:46 IST
Follow Us
  • आजकाल नाश्त्यामध्ये व्यस्त जीवनशैलीमुळे पराठ्याची जागा ब्रेड-बटरने घेतली आहे. काही मिनिटांत तयार होणारा हा नाश्ता बहुतांश वर्किंग लोकांना खायला आवडतो. (Photo-pixabay)
    1/12

    आजकाल नाश्त्यामध्ये व्यस्त जीवनशैलीमुळे पराठ्याची जागा ब्रेड-बटरने घेतली आहे. काही मिनिटांत तयार होणारा हा नाश्ता बहुतांश वर्किंग लोकांना खायला आवडतो. (Photo-pixabay)

  • 2/12

    बहुतेक लोक त्यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्रेड खातात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड उपलब्ध आहेत. बऱ्याच जणांना चहासोबत ब्रेड खायला देखील आवडते. (Photo-pixabay)

  • 3/12

    वेळ वाचवणारा ब्रेडचा हा नाश्ता तुमच्या शरीरासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का. नकळत तुमचे शरीर पोकळ बनवून ते तुम्हाला अनेक रोगांचे बळी देखील बनवू शकते. (Photo-pixabay)

  • 4/12

    अनेकजण सकाळी नाश्ता करतात. परंतु, काहीजण नाश्त्यामध्ये पांढरे ब्रेड (White Bread) खातात. हे ब्रेड आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात. (Photo-pixabay)

  • 5/12

    पांढरे ब्रेड खाणे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. यामुळे आपण शक्यतो पांढरे ब्रेड खाणे टाळलेच पाहिजे. (Photo-pixabay)

  • 6/12

    सर्व ब्रेडमध्ये कॅलरी सामान्य असतात. या सर्वांमध्ये पोषक तत्वांमध्ये फरक आहे. एका पांढर्‍या ब्रेडमध्ये ७७ कॅलरी असतात. परंतु ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असते. पांढऱ्या ब्रेडवर सर्वात जास्त प्रक्रिया केली जाते, म्हणून त्यात कमी पौष्टिक घटक असतात. अधिक ब्रेड खाल्ल्याने आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात हे जाणून घेऊया. (Photo-pixabay)

  • 7/12

    पांढरा ब्रेड मैद्यापासून बनविला जातो, जो परिष्कृत स्टार्चने भरलेला असतो. या गोष्टी साखरेप्रमाणे काम करतात आणि लवकर पचतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. व्हाईट ब्रेडमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यात फायबरचीही कमतरता असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णाने व्हाइट ब्रेड खाणं टाळावं.

  • 8/12

    जर आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त रहायचे असेल तर आपल्या आहारातून पांढरे ब्रेड वगळा. पांढरे ब्रेड खाण्यामुळे तुमचे वजन वाढते, कारण ते परिष्कृत कार्बपासून बनविलेले आहे जे शरीरात साखरेची पातळी वाढवण्यास मदत करते. 

  • 9/12

    पांढर्‍या ब्रेडमध्ये ग्लाइसीमिक इंडेक्स खूप जास्त असतो. जो शरीरात ग्लूकोज वाढविण्याचे काम करतो. मधुमेहाच्या रुग्णांनी पांढरे ब्रेड खाणे टाळले पाहिजे. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते जे धोकादायक असू शकते.

  • 10/12

    रोज ब्रेड खाल्ल्याने व्यक्तीचे पोट खराब होण्याची शक्यता असते. व्हाईट ब्रेडमध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटाशी संबंधित आजार होतात. त्यामुळे पोटदुखी, जुलाब, उलट्या अशा समस्या उद्भवू शकतात.

  • 11/12

    व्हाइट ब्रेड एक रिफाइंड पदार्थ आहे, ज्याचे शरीर नीट विघटन करू शकत नाही. तुम्ही याचे जास्त दिवस सेवन केल्यास रक्ताच्या गुठळ्या देखील होऊ शकतात. यामुळेच याचे दीर्घकाळ सेवन केल्याने काहीवेळा ते अनेक हृदयविकारांचे कारणही बनते.

  • 12/12

    पांढरा ब्रेड कोंडा मुक्त असतो. त्यात फायबरचे प्रमाण नगण्य असते, जे अन्नाचे मंद पचन उत्तेजित करते. यामुळेच ब्रेडचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. (फोटो सौजन्य-संग्रहित छायाचित्र)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Avoid eating white bread for breakfast white bread can cause constipation obesity stomach diabetes heart disease pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.