-
सौंदर्य वाढवण्यासाठी मधाचा वापर वर्षानुवर्षे केला जात आहे. जर तुम्ही शुद्ध मधाचे योग्य पद्धतीने सेवन केले तर त्याचे अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.
-
त्वचा निरोगी, मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही कधीही मधाचा वापर करू शकता. त्यात नैसर्गिक गोडवा असतो, ज्यामुळे ते प्रक्रिया केलेल्या साखरेपेक्षा जास्त आरोग्यदायी बनते. मात्र, मधाचा वापर केव्हा आणि कसा करायचा हेही जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
-
बहसंख्य लोक मधाचे चुकीच्या प्रकारे सेवन करतात. यामुळे त्यांना मधाचे आरोग्यदायी फायदे मिळत नाहीत.
-
गरम पाणी, गरम चहा किंवा कोणत्याही गरम द्रवामध्ये मध कधीही मिसळून पिऊ नये.
-
मध कधीही शिजवू नये. यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
-
मधामध्ये समान प्रमाणात तूप मिसळून कधीही खाऊ नये.
-
उन्हाळ्यात मधाचे सेवन टाळावे. जेव्हा तापमान खूप जास्त असेल तेव्हा मध खाणे योग्य नाही.
-
कच्च्या मधापासून अनेक प्रकारची आयुर्वेदिक औषधे बनवली जातात. मध केवळ रोगप्रतिकारक शक्तीच मजबूत करत नाही तर फुफ्फुस, पोट इत्यादी निरोगी ठेवते. मधाचे सेवन करण्यापूर्वी त्याचा कोणत्या पद्धतीने वापर करणे योग्य आणि फायदेशीर ठरू शकते ही जाणून घेऊया.
-
आयुर्वेदिक डॉ. वरलक्ष्मी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये मध सेवन करण्याच्या योग्य पद्धतीबद्दल महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
-
त्यांनी लिहिलंय, ‘मधाच्या सेवनाबाबत लोक अनेकदा गोंधळलेले असतात. ते केव्हा आणि कसे खावे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. आयुर्वेदात मध खाण्याच्या अनेक योग्य पद्धती आहेत.’
-
मधाला संस्कृतमध्ये ‘मधु’ म्हणतात. कफ दूर करण्यासाठी मध उपयुक्त आहे. इतकेच नाही तर मध या आरोग्यदायी अन्नाचा समावेश प्रत्येकाने त्याचा आहारात केला पाहिजे. मध शरीरात कफ आणि पित्त संतुलित करते.
-
आयुर्वेदिक डॉ. वरलक्ष्मी यांच्या मते, मध सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते साध्या पाण्यात मिसळून सकाळी प्यावे. तुम्ही पाणी उकळून थंड करून त्यात मध घालून पिऊ शकता.
-
फक्त मधाचे सेवन केले तरी फायदा होतो. तथापि, तुम्ही दालचिनी, काळी मिरीसहदेखील मध खाऊ शकता. यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या दूर होऊ शकतात.
-
वसंत ऋतूमध्ये मधाचे सेवन केल्यास उत्तम.
-
(Photos: Pexels)
गरम पाण्यातून मधाचे सेवन करणे ठरू शकते घातक; तज्ज्ञांकडून जाणून घ्या मध खाण्याची योग्य पद्धत
बहसंख्य लोक मधाचे चुकीच्या प्रकारे सेवन करतात. यामुळे त्यांना मधाचे आरोग्यदायी फायदे मिळत नाहीत.
Web Title: Drinking honey from hot water can be dangerous learn the right way to consume honey from experts pvp