• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. oral habits of daily life deteriorate dental health make the change today teeth tooth problems pvp

Oral Health: दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमुळे बिघडते दातांचे आरोग्य; आजच करा बदल

अनेकदा आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपले दात खराब व्हायला सुरुवात होते. या चुका कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

January 25, 2023 10:42 IST
Follow Us
  • tooth health
    1/9

    सुंदर हास्याला सुंदर दातांमुळे अधिक शोभा येते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. निरोगी दात सौंदर्याबरोबरच आपल्या आरोग्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र अनेकदा आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपले दात खराब व्हायला सुरुवात होते. या चुका कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

  • 2/9

    जास्त गोड खाणे आपल्या आरोग्यासह दातांसाठी हानिकारक असते, त्यामुळे दातांना कीड लागून त्यामध्ये पोकळी निर्माण होते.

  • 3/9

    जर तुम्हाला असे वाटत असेल की दात जोरात घासल्याने त्यावर साचलेले बॅक्टेरिया निघून जातील, तर हा चुकीचा समज आहे. याउलट जोरात दात घासल्याने ते खराब होऊन हिरड्यांना नुकसान पोहोचू शकते.

  • 4/9

    जर तुम्ही एखादे ब्रश तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ वापरत असाल तर ते तुमच्या दातांसाठी नुकसानदायक ठरू शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दातांच्या ब्रशचा वापर केवळ तीन महिन्यांसाठीच करावा.

  • 5/9

    सतत तंबाखू चघळल्याने हिरड्यांमधून दातांपर्यंत पोहोचणाऱ्या नसांमध्ये रक्त कमी होते, त्यामुळे हिरड्या आणि दात दोन्ही खराब होतात.

  • 6/9

    आजकाल दातांनी बाटली उघडण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. लोकांना हे करणे कठीण जाते, परंतु दिखावा करण्यासाठी ते बहुतेकवेळा असे स्टंट करतात. मात्र असे करणे आपल्या दातांसाठी हानिकारक ठरू शकते.

  • 7/9

    अनेकदा तणावात असताना लोक नकळतपणे आपले दात चावतात. मात्र ही सवय दातांसाठी हानिकारक ठरू शकते.

  • 8/9

    अनेकांना उन्हाळ्यात बर्फ चघळायला आवडते, असे केल्याने तुमच्या दातांचा इनॅमल खराब होतो.

  • 9/9

    दातामध्ये एखादी गोष्ट अडकली तर लोक टूथपिक किंवा इतर पातळ वस्तूने ते काढण्याचा प्रयत्न करतात, असे केल्याने दाताला इजा होऊ शकते आणि सोबतच हिरड्यांवर जखमा होऊ शकतात. (Photos: Pexels)

TOPICS
हेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Oral habits of daily life deteriorate dental health make the change today teeth tooth problems pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.