-
चेहऱ्यावर येणारी मुरमे हे हल्ली अनेकांच्या चिंतेचे कारण बनले आहे. बदलतं राहणीमान, आहारातील बदल याचा शरीरावर परिणाम होऊन मुरमे येतात.
-
मुरमे घालवण्यासाठी काही सोप्या गोष्टींचा अवलंब केल्यास त्यांच्यापासून सुटका मिळू शकते.
-
शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पाणी. पाण्यात ऑक्सिजन आणि भरपूर न्यूट्रिशन असतात यामुळे रोज योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास त्वचा हायड्रेटेड राहते आणि त्यामुळे मुरमे कमी होऊ शकतात.
-
चेहऱ्याला रोज ऑलिव्ह ऑइल लोशन लावल्याने चेहऱ्यातील छिद्रे न उघडता त्वचेला श्वास घेण्यास मदत करते.
-
लिंबाचा रस हा शरीरातील अनावश्यक आम्ल घटक बाहेर काढून लिंबातील सिट्रिक ऍसिडमुळे यकृत साफ करतो आणि शरीरातील ब्लड टॉक्सिन्स काढून एन्झायमस वाढवतो यामुळे शरीर आतून साफ होऊन मुरमे कमी होऊ शकतात.
-
कलिंगड व्हिटॅमिन अ, ब, आणि क ने परिपूर्ण असून कलिंगडाचा रोजच्या आहारात स्मॅश केल्यास त्वचा ताजी, तेजस्वी,आणि हायड्रेटेड राहते.
-
निरोगी जीवनासाठी संतुलित आहारपद्धती अवलंबणे योग्य असते. लो-फॅट दुग्धजन्य पदार्थात व्हिटॅमिन अ चा समावेश असतो यामुळे त्वचा निरोगी बनते.
-
रास्पबेरी या व्हिटॅमिन, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने परिपूर्ण असून त्याचा फायदा त्वचेला होऊन ती निरोगी राहण्यास मदत करते.
-
दह्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टरीअल गुण हे त्वचेसाठी उपयुक्त असून त्याने मुरमे कमी होण्यास मदत होऊ शकते.
-
अक्रोडचा आहारातील समावेश हा त्वचेतील मुलायमपणा वाढवतो. आणि त्वचा निरोगी होऊन मुरमे कमी होण्याची शक्यता असते.
-
सफरचंदातील पेक्टिन हा घटक मुरमांचा शत्रू मानला जातो. त्यामुळे सफरचंदाचा रोज आहारात समावेश करणं उपयुक्त ठरू शकतं.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)
Photos: मुरमांमुळे हैराण? मग त्यापासून सुटका मिळवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा
मुरमे घालवण्यासाठी काही सोप्या गोष्टींचा अवलंब केल्यास त्यांच्यापासून सुटका मिळू शकते.
Web Title: Photos want to get rid of the acne then follow these easy tips mmj 00