-
भारतात कडक उन्हाळा सुरू झाला असून त्याची झळ सर्वांनाच बसत आहे. अनेक ठिकाणी उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्याही ऐकू येत आहेत. अशा परिस्थितीत स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी थंड फळे आणि पेय यांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
-
या उन्हाळ्यात उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. तसेच टरबूज, काकडी यांसारखी फळे खावीत. इतकेच नाही तर आपल्या आहारात टाक, लिंबूपाणी, वेगवेगळ्या फळांचे रस, यांचा नियमित समावेश करावा.
-
याचबरोबर तुम्ही आपल्या आहारात नारळाच्या पाण्याचाही समावेश करायला हवा. नारळाचे पाणी आपल्या शरीराला हायड्रेट करतोच, पण त्याचबरोबर अनेक आजारही लांब ठेवतो.
-
जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर नारळपाणी खूपच उपयुक्त सिद्ध होऊ शकते. नारळपाणीमध्ये केवळ एक पदार्थ मिसळून प्यायल्यास तुम्हाला आश्चर्यकारक फायदे जाणवू शकतात.
-
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी एक ग्लास नारळपाण्यात अर्धा चमचा सब्जा मिसळून प्यावा.
-
नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असून ते कमी कॅलरी असलेले पेयदेखील आहे.
-
यासोबतच त्यात अँटिऑक्सिडंट्स, एमिनो-अॅसिड, एन्झाइम्स, बी-कॉम्प्लेक्स सारखे घटकही आढळतात, जे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करतात.
-
यासोबतच नारळाचे पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकते. इतकेच नाही, तर ते रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी करण्यास मदत करते.
-
तुळशीच्या बिया म्हणजेच सब्जादेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या बियांमध्ये प्रथिने, निरोगी चरबी, कार्ब आणि फायबर भरपूर असतात.
-
याबरोबरच त्यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यांसारखे पोषक घटकही भरपूर असतात. याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो.
-
यामध्ये आढळणारे फायबर वजन कमी करण्यास मदत करते. याशिवाय सब्जाच्या बिया बद्धकोष्ठता, अशक्तपणा दूर करण्याबरोबरच हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
-
सब्जाच्या बियांना सुपर फूड म्हणतात. अनेकांना त्याची चव आवडत नाही, पण आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. (Photos: Freepik)
यंदाच्या उन्हाळ्यात झटपट कमी होईल वाढलेलं वजन; ‘हे’ एक पेय ठरेल सर्व समस्यांवर रामबाण उपाय
नारळपाणीमध्ये केवळ एक पदार्थ मिसळून प्यायल्यास तुम्हाला आश्चर्यकारक फायदे जाणवू शकतात.
Web Title: Healthy food health diet quickly reduce the increased weight this summer coconut water sabja seed drink will cure all problems pvp