• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. world malaria day 2023 what to avoid during malaria know more yps

World Malaria Day 2023: मलेरिया झाल्यावर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; नाहीतर आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Malaria Day 2023: मलेरियाग्रस्त रुग्णांनी कोणते पदार्थ खाणे टाळाले पाहिजे ते जाणून घ्या..

April 25, 2023 11:53 IST
Follow Us
  • जागतिक आरोग्य संघटनेद्वारे दरवर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिवस (World Malaria Day) साजरा केला जातो. लोकांमध्ये या आजाराबाबत जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने २००७ मध्ये WHO द्वारे याची सुरुवात करण्यात आली.
    1/9

    जागतिक आरोग्य संघटनेद्वारे दरवर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिवस (World Malaria Day) साजरा केला जातो. लोकांमध्ये या आजाराबाबत जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने २००७ मध्ये WHO द्वारे याची सुरुवात करण्यात आली.

  • 2/9

    मलेरियाच्या संक्रमणामुळे प्रत्येक वर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत असतो. या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना प्रयत्नशील आहे. यात आरोग्य संघटनेला जगभरातील देशाची मदत मिळत आहे.

  • 3/9

    ॲनाफिलीस डासाच्या प्रजातीमधील मादी डासामुळे मलेरिया होत असतो. ही मादी डास साठलेल्या पाण्यामध्ये वास्तव्य करुन अंडी घालत असते. त्यामुळे मलेरियाचा त्रास होऊ नये म्हणून आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा.

  • 4/9

    मलेरियाग्रस्त रुग्णाच्या शरीरात रक्तामधील प्लेटलेट्स कमी होत जातात. यामुळे अशक्तपणा, ताप, डोकेदुखी, उल्टी येणे तसेच स्नायूंमध्ये क्रॅम्प येणे अशा गोष्टी व्हायला सुरुवात होते. स्थिती गंभीर झाल्याने यकृत-किडनीवरही नकारात्मक परिणाम होतो.

  • 5/9

    मलेरिया झाल्यावर लगेच उपचार करवून घेणे आवश्यक असते. या काळात काही ठराविक पदार्थांमुळे तब्येत अधिक खराब होऊ शकते. आहारामध्ये या पदार्थांचा समावेश असल्यास परिस्थिती बिघडू शकते.

  • 6/9

    फॅटयुक्त पदार्थ – तूप, मलाई, लोणी अशा काही पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात फॅट्स असतात. या पदार्थांचे अधिक सेवन केल्याने मलेरियाग्रस्त रुग्णाला उल्टी होऊ शकते.

  • 7/9

    तिखट मसालेदार पदार्थ – मलेरिया असलेल्या व्यक्तीने तिखट पदार्थ खाणे टाळावे. अशा पदार्थांमुळे शरीराला त्रास होऊ शकतो. मसालेदार पदार्थांऐवजी घरी बनवलेले पदार्थ खाणे योग्य असते.

  • 8/9

    हाय-फायबर असलेले पदार्थ – हिरव्या पालेभाज्यांप्रमाणे काही पदार्थ हाय फायबरने भरलेले असतात. यांच्या सेवनामुळे यकृत/ जठराशी संबंधित त्रास वाढण्याची शक्यता असते.

  • 9/9

    कॅफीनयुक्त पदार्थ – चहा, कॉफीमध्ये मुबलक प्रमाणात कॅफीन असते. मलेरिया असताना कॅफीनमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. म्हणून अशा पदार्थांचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. (सर्व फोटो – Freepik आणि लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
मलेरियाMalariaमलेरिया आजारMalaria Diseaseलाइफस्टाइलLifestyleहेल्थ न्यूजHealth News

Web Title: World malaria day 2023 what to avoid during malaria know more yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.