-
आंबा हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. त्यातून जर तो हापूस असेल तर बातच न्यारी! पण अस्सल हापूस कसा ओळखायचा हे तुम्हाला माहीत आहे का?
-
कोकणातला हापूस आंबा अत्यंत प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने देवगड, रत्नागिरी या ठिकाणांहून तो विविध शहरांमध्ये विक्रीसाठी आणला जातो.
-
पण अनेकदा पहिला आंबा खाण्याच्या नादात लोक तो कसा पिकवला आहे किंवा तो अस्सल हापूस आहे की नाही हे पारखण्यास कमी पडतात.
-
याचबरोबर हापूससारखेच दिसणारे दुसऱ्या जातीचे आंबेही बाजारात येतात. त्यामुळेही अनेकदा गोंधळ होऊ शकतो. पण अस्सल आणि कोणतेही रसायन न वापरता पिकवलेला हापूस ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती आहेत.
-
१. सुवास –
हापूस आंब्याचा वास आंबे पिकताना आजूबाजूला दरवळतो. रसायने वापरून पिकवलेल्या आंब्याला कसल्याही प्रकारचा वास येत नाही. -
२. आकार –
हापूस आंबा हातात घेतल्यावर तो आतून भरलेला आणि आकाराने काही अंशी गोल दिसतो. याचा अर्थ इतर आंब्यांप्रमाणे त्याची खालची बाजू निमुळती नसते. तर त्याच्या देठाकडील भाग हा काहीसा मऊ असतो. -
३. रंग –
हापूस आंबा हा पूर्णपणे पिवळा कधीही नसतो. नैसर्गिकरीत्या पिकवलेला हापूस हा आधी हिरवा, मग पिवळा आणि नंतर काहीसा लालसर होतो. जर संपूर्ण आंब्याला एकच रंग असेल तर तो रसायने वापरून पिकवलेला असल्याची शक्यता अधिक असते. -
४. साल –
हापूस आंब्याची साल इतर आंब्यांच्या मानाने पातळ असते. तर याचबरोबर त्याचा स्पर्श अत्यंत मऊ असतो. रसायने वापरून पिकवलेला आंबा हाताला थोडा कडक आणि खरखरीत लागतो. -
५. चव –
हापूस आंब्याची चव ही कमी तंतुमय आणि खास असते. आंब्याची फोड खाल्ल्यानंतर त्याची चव आपल्या जिभेवर बराच काळ राहते.
घ्या जाणून रसायने न वापरता पिकवलेला अस्सल हापूस आंबा ओळखण्याच्या सोप्या पद्धती
हापूससारखेच दिसणारे दुसऱ्या जातीचे आंबेही बाजारात येतात. त्यामुळे अनेकदा गोंधळ होऊ शकतो.
Web Title: Know how to identify chemical free grown and pure alphonso mango rnv