-
कपडे धुण्याचेसुद्धा काही नियम आहेत, हे तुम्हाला माहितेयत का…
-
आपल्यापैकी अनेकजण सर्व कपडे एकाच बादलीत धुण्यासाठी टाकतात. यामध्ये काही कपडे वेगळे धुवावे लागतील असा विचार देखील आपण करत नाही.
-
आपल्यापैकी बरेच जण अजूनही अंडरवेअर इतर कपड्यांसोबतच एकत्र धूत असाल, पण तुम्हाला माहित आहे असं करणं अगदी चुकीचं आहे.
-
संशोधकांच्या मते, एका अंडरवेअरमध्ये एका दिवसाला १० ग्रॅम घाण जमा होऊ शकते, म्हणून कल्पना करा की जेव्हा तुम्ही ते तुमच्या उर्वरित कपड्यांसह वॉशिंग मशीनमध्ये धुता तेव्हा काय होते?
-
ज्या पाण्यात अंडरवेअर धुतली जाते त्या पाण्यात सुमारे १०० दशलक्ष एस्चेरिचिया कोलाई आणि स्टॅफिलोकोकस ऑरियस बॅक्टेरिया असू शकतात. ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो.
-
एका संशोधनानुसार, अंडरवेअर इतर कपड्यांमध्ये मिसळून धुतल्याने पाण्यात १०० दशलक्ष E. coli (Escherichia coli) पसरू शकतात, ज्यामुळे तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
-
विशेषत: अंडरवेअरमध्ये भरपूर बॅक्टेरिया असतात. म्हणूनच असे कपडे किमान ४० अंश सेल्सिअस तापमानात धुवावेत. जर ते परिधान करणार्या व्यक्तीला कोणताही संसर्ग झाला असेल, तर ते अंतर्वस्त्र गरम पाण्यात वेगळे धुण्याची गरज अधिकच वाढते.
-
तुम्ही स्वयंपाकघरातील कपडे अंडरवेअरसोबत धुतले तर याच किचन कपड्याला स्टॅफिलोकोकस ऑरियस आणि ई. कोलाय सारख्या जीवाणूंचा संसर्ग होतो.
-
आणि मग तुम्ही जेव्हा भांडी स्वच्छ करण्यासाठी या कपड्याचा वापर करता तेव्हा हे बॅक्टेरिया तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकतात.
-
अंडरवियरमध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असतात. म्हणूनच ते खूप गरम पाण्यात धुवावेत.
-
अंडरवेअर धुण्यासाठी डिटर्जेंट सोबत ब्लिचचा वापर करा आणि तेही गरम पाण्यात तेव्हाच ते स्वच्छ धुतले जातील आणि संसर्ग पसरवणारे जंतू मरून जातील.
-
(फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र)
तुम्हीही इतर कपड्यांसह अंडरवेअर धुता काय? तज्ज्ञांचा ‘हा’ धक्कादायक खुलासा वाचून बसेल धक्का!
Underwear Washing Tips: आतले कपडे स्वच्छ असणे अतिशय गरजेचे असते. तुम्ही पण अंडरवेअर इतर कपड्यांसोबत धुता काय?..तज्ज्ञ काय सांगतात…?
Web Title: Underwear washing tips why you should wash your underwear separately pdb