• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. vaginal health why does your vagina clam up and how does it impact your fertility information shared by dr aviva pinto rodrigues pdb

योनी बंद होते म्हणजे नेमकं काय? यामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो? काय सांगतात तज्ज्ञ…

योनीमार्गाच्या आरोग्याकडे महिला फारसं लक्ष देत नाहीत आणि समस्या उद्भवतात. पण या समस्येवर वेळीच उपाय करणंही गरजेचं आहे.

August 11, 2023 09:47 IST
Follow Us
  • स्त्रियांच्या योनी आरोग्याबाबत खूप कमीवेळा बोललं जातं. पण अशा अनेक समस्या आहेत ज्याबद्दल खुलेपणाने बोलणे आवश्यक आहे.
    1/15

    स्त्रियांच्या योनी आरोग्याबाबत खूप कमीवेळा बोललं जातं. पण अशा अनेक समस्या आहेत ज्याबद्दल खुलेपणाने बोलणे आवश्यक आहे.

  • 2/15

    योनीमार्गाच्या आरोग्याविषयी महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत. Vaginal health म्हणजेच योनीमार्गाच्या आरोग्याकडे महिलाही फारसं लक्ष देत नाहीत.

  • 3/15

    स्त्रीच्या योनीबाबतही अनेक तक्रारी समोर येतात. यातीलच एका समस्येविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, जी स्त्रीला जाणवली असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

  • 4/15

    योनी मार्गामध्ये एक विचित्र प्रकारचा अत्याधिक घट्टपणा (vaginal tightness) किंवा योनी बंद (closed vagina) असल्याची समस्या स्त्रीयांना जाणवली असल्याची माहिती समोर आलीये.

  • 5/15

    प्रजनन तज्ज्ञ डॉ. अविवा पिंटो रॉड्रिग्स यांच्या मते, योनीमधील अत्याधिक घट्टपणा हे वेजिनिस्मसचे लक्षण मानले जाऊ शकते.

  • 6/15

    वेजिनिस्मसच्या वेदना पेनिट्रेशनच्या दरम्यान किंवा संभोगाच्या वेळी, संभोग करताना, टैम्पोन लावताना आणि पेल्विक एग्जाम दरम्यान ही समस्या उद्भवते.

  • 7/15

    अनेक तरुणींना या समस्येमुळे वैवाहिक जीवनात त्रास सहन करावा लागतो. या स्थितीला Vaginismus असे म्हणतात; या कारणामुळे स्त्रिया शारीरिक संबंध ठेवण्यापासून दूर पळतात.

  • 8/15

    ही स्थिती कशामुळे उद्भवते याबाबत बरेच स्त्रिया अजूनही सांगताना संकोच करतात. यामागे एक निश्चित कारण नाही, पण अशी परिस्थिती अनेकदा एक प्रकारच्या भीतीमुळे निर्माण होते, असे तज्ज्ञ रॉड्रिग्स सांगतात.

  • 9/15

    यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की, चिंता, योनी मार्गातील झीज, एखादी शस्त्रक्रिया, लैंगिक शोषण, बलात्कार किंवा मानसिक आघात अशा घटनांमुळेदेखील जोडीदाराबरोबर जवळीक निर्माण करण्यासाठी भीती वाटणे किंवा नकारात्मक भावना निर्माण होते.

  • 10/15

    तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, यावर प्राथमिक उपचार असून यामध्ये क्रीम आणि ल्युब्रिकंट्सचा वापर सुरू करता येते. डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच योग्य उपाय केल्यास समस्या टाळता येतात.

  • 11/15

    प्रजनन क्षमतेवर परिणाम झाल्यास त्याचे निदान तज्ज्ञांच्या मदतीने करता येते. त्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही.

  • 12/15

    Vaginal Dilator थेरपी हे योनी मार्गाच्या स्नायूंना ताणण्यासाठी आणि संभोग करताना योनीला त्रास होऊ नये, अधिक आरामदायक बनविण्यासाठी हे एक Manipulation device आहे.

  • 13/15

     कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) हे चिंता, नैराश्य आणि कोणत्याही प्रकारचे पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) हाताळण्यास मदत करते आणि तुमच्या मनातील भीती दूर करण्यास मदत करते.

  • 14/15

    पेल्विक फ्लोअर फिजिकल थेरपी यामध्ये व्यायामाचा एक भाग आहे. जिथे ट्रेनर तुम्हाला स्नायू शिथिल करण्याचे व्यायाम शिकवतो, जे तुम्हाला तुमच्या योनीच्या प्रतिसादांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल, असे तज्ज्ञ रॉड्रिग्स सांगतात.

  • 15/15

    (हे ही वाचा : Oral Sex: ओरल सेक्सने घशाचा कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा ‘हा’ दावा खरं आहे का? म्हणाले, “तोंडावाटे…” ) (फोटो सौजन्य:.freepik)

TOPICS
हेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Vaginal health why does your vagina clam up and how does it impact your fertility information shared by dr aviva pinto rodrigues pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.