-
डिसेंबर महिन्यात तब्बल पाच ग्रहांचे राशी व नक्षत्र परिवर्तन होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह आपल्या कक्षेत महत्त्वाच्या हालचाली करतो तेव्हा त्याचा प्रभाव १२ राशींवर दिसून येतो
-
डिसेंबर महिन्याच्या शेवटाकडे यंदा तब्बल सात राजयोग तयार होत आहेत. मंगळ, शुक्र, शनी हे ग्रह या काळात सक्रिय असणार आहेत. यामुळे तब्बल ७ राजयोग तयार होत आहेत.
-
यातील समसप्तक राजयोग हा तब्बल १०० वर्षांनी तर मालव्य राजयोग ५० वर्षांनी तयार होत आहे. तसेच या कालावधीत लक्ष्मी नारायण योग, केंद्र त्रिकोण राजयोग,महाधनी राजयोग, धनशक्ती राजयोग व काम राजयोग सुद्धा तयार होत आहेत
-
डिसेंबर महिन्यातील या राजयोगांमुळे तीन राशींसाठी २०२४ ची सुरुवात धमाकेदार होणार आहे. या राशींना येत्या नववर्षात करोडपती होण्याची संधी आहे. या राशी कोट्या व त्यांना कसा लाभ होणार हे पाहूया..
-
तूळ रास: तूळ राशीसाठी धनवृद्धी व प्रगतीसाठी नवीन वर्षात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. सर्व प्रबळ राजयोग तुमच्या कर्म भावात असल्याने तुम्हाला नोकरीत प्रगतीची नामी संधी मिळू शकते. जर तुम्ही परदेशात नोकरीच्या संधी शोधत असाल तर लवकरच तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे आहेत
-
तुम्हाला आरोग्याच्या समस्यांमधून सुटका मिळू शकते. जुनाट आजार नष्ट होतील. विद्यार्थ्यांच्या वाटेतील अडथळे दूर झाल्याने एकाग्रता वाढून कामात यश मिळू शकते. गुरु कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश लाभू शकते परिणामी तुम्हाला प्रचंड श्रीमंती अनुभवता शकते
-
मकर रास: शनी आणि गुरूचे उत्तम पाठबळ असल्याने मोठमोठी कामे हातावेगळी कराल. विद्यार्थी वर्गाला ग्रहयोग पूरक आहेत. उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे असल्यास संधी सोडू नका. नोकरी व्यवसायात आपले अंदाज खरे ठरतील. कामानिमित्त प्रवास कराल. हुरूप वाढेल.
-
जोडीदाराच्या साथीने घेतलेले महत्वाचे निर्णय योग्य ठरतील. विवाहोत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळेल. जोडीदाराच्या रूपातच प्रचंड धनप्राप्ती होऊ शकते.
-
कुंभ रास: या राशीच्या पाचव्या स्थानी मालव्य राजयोग तयार होत आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. प्रगतीसह पदोन्नती होऊ शकते. तुम्ही मित्र किंवा कुटुंबासह लांबच्या प्रवासाला जाऊ शकता
-
शनिदेव तुमच्या राशीचे स्वामी आहेत व नोव्हेंबरपासूनच शनीदेव मार्गी असल्याने तुमच्या कुंडलीत धनप्राप्तीचे थेट मार्ग उपलब्ध होणार आहेत. वाहन, मालमत्ता, घर खरेदीसाठी हा काळ अतिशय चांगला आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
-
टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.
५० वर्षांनी मालव्य राजयोगासह तीन शुभ योग बनल्याने २०२४ मध्ये ‘या’ तीन राशी होणार करोडपती? पाहा भविष्यवेध
2024 Lucky Zodiac Signs: डिसेंबर महिन्यातील या राजयोगांमुळे तीन राशींसाठी २०२४ ची सुरुवात धमाकेदार होणार आहे. या राशींना येत्या नववर्षात करोडपती होण्याची संधी आहे.
Web Title: Shani shukra mangal makes 50 years later malavya rajyog these three rashi to get millions of money in 2024 bhavishyavani svs