-
थंडीच्या दिवसात लोकांना सर्दी, खोकला, यांसारख्या समस्यांचा त्रास होऊ लागतो.(फोटो : Freepik)
-
यासोबतच हिवाळा ऋतू जवळ आला की आपली त्वचा आणि केस निस्तेज आणि निर्जीव होऊ लागतात. अशा परिस्थितीत रोज मेथीदाणे खाल्ल्यास या समस्यांपासून आराम मिळतो. (फोटो : Freepik)
-
मेथीमध्ये उष्ण प्रकृती असते जी शरीराला आतून उबदार ठेवते.याशिवाय मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात. (फोटो : Freepik)
-
जीवनसत्त्वे ए, सी, ई सह आवश्यक खनिजे मेथीच्या दाण्यांमध्ये आढळतात. हे सर्व घटक केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. चला तर याबद्दल जाणून घेऊया.(फोटो : Freepik)
-
मेथी आपली पचनसंस्था आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते. मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते जे आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे.(फोटो : Freepik)
-
मेथी पाचक रसांचे स्राव वाढवते ज्यामुळे अन्न पचणे सोपे होते. त्यामुळे अॅसिडिटी, गॅस आणि अपचनाची समस्याही कमी होते.(फोटो : Freepik)
-
मेथीमुळे केस मजबूत होतात आणि ते तुटण्यापासून वाचतात.मेथीमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, झिंक, मॅग्नेशियम आणि प्रोटीन यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. (फोटो : Freepik)
-
केस आतून निरोगी आणि मजबूत बनवतात. मेथीच्या रोजच्या वापरामुळे केस गळणे आणि कोंडा यासारख्या केसांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. आणि नवीन केस वाढण्यास मदत होते.(फोटो : Freepik)
-
मेथीच्या दाण्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी करण्यास मदत करते. (फोटो : Freepik)
केस गळतीमुळे टक्कल पडले? मेथी दाण्याचा एक सोपा उपाय, काही दिवसात केस होतील दाट
महिलांनो इकडे लक्ष द्या! मासिक पाळीत गुणकारी ठरतात मेथीचे दाणे, आरोग्यासाठी जाणून घ्या अफलातून फायदे
Web Title: 5 health benefits of fenugreek seeds helpful for hairs and menstrual cycle srk