-
व्यायामाला वेळ नाही, अशी अनेकांची तक्रार असते. पण दोस्तांनो, चांगलं आरोग्य हवं तर हे टाळून चालणार नाही. भले आपण कितीही बिझी असू, तरी व्यायामासाठी थोडा वेळ काढणं आवश्यक आहेच. (फोटो : Freepik)
-
तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे सकाळी एक तासही वेळ मिळत नाही का? काही हरकत नाही. दिवसभराच्या कामातून थोडा वेळ काढा. तुम्ही स्नॅकिंगअंतर्गत एकदाच तासभर जीममध्ये जाऊन घाम गाळण्यापेक्षा छोट्या-छोट्या टप्प्यांमध्ये व्यायाम करणं याचा समावेश करु शकता. (फोटो : Freepik)
-
फिटनेस स्नॅकिंग’ म्हणजे थोड्या-थोड्या वेळाच्या अंतराने व्यायाम करणं; याला ‘फिटनेस स्नॅकिंग’ असं म्हणतात. या फिटनेस ट्रेंडबाबत आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. (फोटो : Freepik)
-
स्नॅकिंगअंतर्गत नियमित व्यायाम होत असल्याने हृदयरोग, सांधेदुखी आणि रक्तदाब अशा आजारांपासून बचाव करता येतो. फिटनेस स्नॅकिंगमुळे शरीराला लवचिकता मिळते. (फोटो : Freepik)
-
वर्कआउटसाठी आपल्याला फक्त डेस्क किंवा खुर्चीची आवश्यकता आहे. या व्यायामामध्ये स्लो जॉगिंग, पुश-अप्स, स्ट्रेचेस, एका जागेवर जोरदार चालणे यांचा समावेश असू शकतो. (फोटो : Freepik)
-
खुर्चीवर सरळ बसा. दोन्ही हातांनी खुर्चीचा मागचा भाग धरून उजव्या बाजूला वळवा, पुन्हा डाव्या बाजूला वळवा. आपले हात डेस्कवर ठेवा आणि आपले पाय उजवीकडून डावीकडे, पुढे आणि मागे फिरवा.(फोटो : Freepik)
-
खुर्चीवर बसा, पुढे वाकून बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त, मान फिरवणे, हात ताणणे, खांद्याचे व्यायामदेखील फक्त पाच मिनिटांत करता येतात.(फोटो : Freepik)
-
तासन्तास व्यायाम करणं कंटाळवाणं वाटत असल्यास स्नॅकिंग हा उत्तम पर्याय आहे. हा पर्याय अमलात आणल्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यास मदत होते.(फोटो : Freepik)
-
फिटनेस स्नॅकिंग हे अनेकांना सोपं वाटत असलं, तरी ते प्रत्यक्षात मात्र तसं नाही, कारण यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन स्नॅकिंग केलं, तर तुम्ही आरोग्यदायी जीवन जगू शकता.(फोटो : Freepik)
फिटनेस स्नॅकिंगचा ट्रेंड नक्की काय? जाणून घ्या डॉक्टरांनी व्यायामाला सुचवलेला पर्याय
काय आहे फिटनेस स्नॅकिंगचा ट्रेंड? जाणून घ्या. त्यामुळे व्यायाम होतोच, शिवाय वेळ मिळत नाही ही समस्याही दूर होते.
Web Title: What is exercise snacking and how can it help you keep to daily fitness goals srk