-
फक्त पुण्यातीलच नाही तर पु्ण्याजवळ सुद्धा फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पुण्याजवळ फिरण्यासाठी चांगली ठिकाणे सुचवित असतात. (Photo : Social Media)
-
पुणे हे देशातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू पुण्याच्या सौंदर्यात भर घालतात. (Photo : Social Media)
-
शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे इतर अनेक गोष्टींसाठी लोकप्रिय आहे. पुण्याची मिसळ असो की पुणेरी पाट्या नेहमी चर्चेत असतात. (Photo : Social Media)
-
शनिवारवाडा, नाना वाडा, केळकर म्युझियम, दगडूशेठचा गणपती, पर्वती टेकडी, बाणेर टेकडी, तुळशीबाग, लाल महाल, चतुशृंगी मंदिर असे अनेक ठिकाणे आहेत जे पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाने बघितले पाहिजे. (Photo : Loksatta)
-
१. सिंहगड किल्ला – सिंहगड किल्ला हा पुणे शहरापासून फक्त ३०-२५ कि.मी अंतरावर आहे. ही पुण्यातील ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तू आहे. (Photo : Loksatta)
-
२.पवना तलाव – पवना तलाव हे पुण्यापासून ५० किमी अंतरावर आहे. वनडे ट्रिपसाठी हे बेस्ट ठिकाण आहे. या तलावाजवळ कॅम्पिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. (Photo : Social Media)
-
३.लोणावळा – लोणावळा हे पुण्यापासून ६५ किमी अंतरावर आहे. तुम्ही पावसाळा आणि हिवाळ्यात लोणावळ्याला भेट देऊ शकता. थंड हवेचे ठिकाण असलेले लोणावळा प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. (Photo : Social Media)
-
४. राजगड किल्ला – गडांचा राजा आणि राजांचा गड अशी ओळख असलेला राजगड किल्ला हा पुण्यापासून ४८ किमी अंतरावर आहे.हा किल्ल्याला सुद्धा तुम्ही अवश्य भेट देऊ शकता. (Photo : Social Media)
-
५. खडकवासला धरण – पुण्यापासून खडकवासला धरण फक्त २० किमी अंतरावर आहे.खडकवासला धरणातूनच पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. खडकवासला एक दिवसाच्या सहलीसाठी योग्य पिकनिक स्पॉट आहे. (Photo : Social Media)
Pune : पुण्याजवळच्या या ५ बेस्ट ठिकाणांना अवश्य भेट दया…
फक्त पुण्यातीलच नाही तर पु्ण्याजवळ सुद्धा फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पुण्याजवळ फिरण्यासाठी चांगली चांगली ठिकाणे सुचवित असतात.
Web Title: Pune list of 5 best places to visit near pune on weekend ndj