-
केसांच्या विविध प्रकारांनुसार त्याची काळजी घ्यावी लागते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कुरळ्या केसांची नीट काळजी घेतली नाही. तर केस राठ आणि कोरडे दिसू लागतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यामुळे कुरळे केस छान दिसावे असे वाटत असेल. तर त्याची काळजी घेणे हाच एक पर्याय आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
केस घनदाट आणि सुंदर दिसण्यासाठी आठवड्यातून किंवा तुमच्या आवडीनुसार एकदा तरी हेअर मास्क लावणे गरजेचं आहे. कुरळे केस घनदाट दिसण्यासाठी पुढील पाच हेअर मास्क फायदेशीर ठरतील. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. अंडी आणि एवोकॅडोचा हेअर मास्क : एका बाऊलमध्ये एक अंडे फोडून घ्या. त्यात तीन चमचे ऑलिव्ह ऑइल, एक चमचा मध आणि अर्धा एवोकॅडो मिक्स करा व पेस्ट तयार करून घ्या. हे मिश्रण केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा आणि १५ मिनिटांनंतर शॅम्पूने धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. दही आणि अॅप्पल सायडर व्हिनेगर हेअर मास्क : एक कप दही, दोन चमचे अॅप्पल सायडर व्हिनेगर आणि एक चमचा मध मिक्स करा. हे मिश्रण केसांना लावा आणि ३० मिनिटे असंच राहू द्या. त्यानंतर शॅम्पूने केस हलक्या हाताने धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. एवोकॅडो आणि ऑलिव्ह ऑइल हेअर मास्क : एका बाऊलमध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये एक एवोकॅडो मिक्स करा . ही पेस्ट तुमच्या केसांना लावा आणि १५ मिनिटे तसंच राहू द्या. त्यानंतर शॅम्पूने केस हलक्या हाताने धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. तांदळाचे पाणी आणि एवोकॅडो हेअर मास्क : एक कप तांदूळ, दोन कप पाण्यात तासभर भिजत ठेवा. त्यानंतर यातील पाणी काढून घ्या. एवोकॅडो स्मॅश (हाताने बारीक करावा) करा आणि तांदळाच्या पाण्यात मिक्स करा. हे मिश्रण केसांना लावा आणि २० मिनिटे तसंच राहू द्या. त्यानंतर शॅम्पूने केस हलक्या हाताने धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. दही आणि केळीचा हेअर मास्क : सोलून घेतलेली केळं, तीन चमचे दही आणि एक चमचा मध मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा आणि २० मिनिटे तसंच राहू द्या. त्यानंतर शॅम्पूने केस हलक्या हाताने धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
Curly Hair Tips: कुरळ्या केसांसाठी ‘हे’ पाच हेअर मास्क ठरतील फायदेशीर; नक्की वाचा
कुरळ्या केसांसाठी घरच्या घरी तयार करा हेअर मास्क…
Web Title: Make home made five hair masks for curly and bouncy hairs steps must read asp