-
Tomato for skin care: टोमॅटो आरोग्यासह त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. याचा वापर अनेक फेस पॅक्समध्येही केला जातो. फेस पॅक्स त्वचेत चमकदारपणा आणतात.सोबतच त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यातही टोमॅटो प्रभावी ठरतो. (Photo: Freepik)
-
टोमॅटो चेहऱ्यावरची काळी वर्तुळं दूर करतं. चेहऱ्यावरचे इतरही डाग साफ करण्यासाठी टोमॅटो प्रभावी ठरतो. (Photo: Freepik)
-
चेहऱ्याला एकदम सुंदर, ताजा बनवतो. टोमॅटोपासून बनवता येतील असे काही फेस पॅक कुठले हे समजून घ्या. (Photo: Freepik)
-
पिकलेल्या टोमॅटोची प्युरी करा त्यात १ चमचा मध घाला आणि चांगले मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा आणि कोमट पाण्यानं धुवुन टाका. हा फेस पॅक त्वचेला मॉइश्चरायझ करण्यात मदत करतो. (Photo: Freepik)
-
टोमॅटो, दही आणि लिंबाचा रस एकत्र लावल्यामुळे त्वचेला फायदा होतो. हा मास्क नॅचरल ब्लीचचं काम करतो. या मास्कमुळे चहेऱ्यावरील त्वचेचे केस कमी होतात. त्वचा तजेलदार आणि चमकदार होते. (Photo: Freepik)
-
पिकलेल्या टोमॅटोची प्युरी करा आणि गव्हाच्या पिठामध्ये पूर्णपणे मिसळा. तयार मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे राहू द्या.(Photo: Freepik)
-
२० मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवण्यात मदतशील ठरतो. हा त्वचेवरचं विनागरजेचं असं तेल काढून टाकतो. (Photo: Freepik)
-
टोमॅटोच्या प्युरीमध्ये हळद पावडर घाला आणि नीट मिक्स करा. मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर २० मिनिटे तसेच चेहऱ्यावर राहुद्यात. हा फेस मास्क त्वचेला उचळ करण्यास मदत करतो.(Photo: Freepik)
-
वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. (Photo: Freepik)
Skin care: टोमॅटोसारखी रसरशीत मऊ स्किन हवी, मग असा बनवा टोमॅटो रसाचा फेसपॅक!
चेहऱ्यावर एक डाग राहणार नाही; टोमॅटोचा वापर करून मिळवा सुंदर त्वचा, जाणून घ्या ४ घरगुती फेस पॅक
Web Title: Tomato benefits for soft and glowing skin homemade tomato honey curd lemon skin glow facemask srk