Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to get rid of facial hair at home try these four rice flour face mask follow simple steps dha

Beauty hack : तांदळाचे पीठ चेहऱ्यावरील केसांसाठी ठरेल जादुई उपाय! घरच्याघरी करून पाहा हे सोपे उपाय

चेहऱ्यावरील केस किंवा लव काढण्यासाठी रेझर, वॅक्सिन्गला पर्याय म्हणून तांदळाच्या पिठाचा वापर करून चार घरगुती उपाय वापरून पाहा.

March 10, 2024 20:10 IST
Follow Us
  • How to remove facial hair at home
    1/7

    अनेक स्त्रिया आपले सौंदर्य जपण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. त्वचा मऊ, मुलायम दिसण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन हाता-पायांवरील केस काढण्यासाठी वॅक्सिन्ग करून घेतात. तसेच, चेहऱ्यावरील त्वचा नितळ दिसण्यासाठीही अनेकदा वॅक्स किंवा रेझरचा वापर केला जातो.पण अशा गोष्टींनी त्वचेला त्रास होऊ शकतो. त्वचा निब्बर आणि खरखरीत होऊ शकते. [Photo credit – Freepik]

  • 2/7

    असे होऊ नये यासाठी घरातील तांदळाचे पीठ आणि इतर गोष्टी तुम्ही खूप मदत करू शकतात. स्वयंपाकघरातील गोष्टींचा वापर करून, आपण घरच्याघरी वेदनारहित पद्धतीने चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढू शकतो. अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते. अशा घसरगुती गोष्टी वापरुन आपण ४ मास्क कसे बनवायचे आणि कसे वापरयाचे हे पाहू. [Photo credit – Freepik]

  • 3/7

    तांदळाचे पीठ आणि दुध
    दोन चमचे तांदुळाच्या पिठात चमचाभर दूध घालून घट्ट पेस्ट तयार करा. तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावरील अनावश्यक केस आहेत तिथे लावून घ्या. पेस्ट लावल्यावर ५-१० मिनिटे हलक्या हाताने मसाज करून, ती पेस्ट चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी तशीच लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय तुम्ही आठवड्यातून २ किंवा ३ वेळेस करून शकता. [Photo credit – Freepik]

  • 4/7

    तांदळाचे पीठ आणि हळद
    २ चमचे तांदळाचे पीठ, एक चमचा हळद आणि थोडे गुलाब पाणी घालून, सर्व गोष्टी एकत्र मिसळून घ्या. तयार झालेली पेस्ट, चेहऱ्यावरील अनावश्यक केस असणाऱ्या भागांवर लावून ठेवा. १० ते १५ मिनिटानंतर ही पेस्ट कोरडी झाल्यानंतर, ती हाताने चोळून चेहऱ्यावरून काढून टाका. कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यावर मॉइश्चराइझर लावा.[Photo credit – Freepik]

  • 5/7

    तांदळाचे पीठ आणि पपई
    पपईच्या काही फोडी कुस्करून, त्यामध्ये २ चमचे तांदळाचे पीठ आणि १ चमचा मध एकत्र करून घ्यावे. तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर जिथे केस आहे त्या ठिकाणी लावून घ्या. हा मास्क चेहऱ्यावर साधारण २० ते ३० मिनिटे तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. [Photo credit – Freepik]

  • 6/7

    तांदळाचे पीठ आणि अंड्याचा पांढरा बल्क
    एक अंडे फोडून, त्याचा केवळ पांढरा भाग चांगला फेटून घ्या. यात २ चमचे तांदळाचे पीठ मिसळून त्याची एक पेस्ट तयार करून घ्या. चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांच्या भागावर हे मिश्रण लावून घ्यावे. आता १५ ते २० मिनिटांसाठी हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच ठेवावे. मिश्रण वाळल्यानंतर, तो वाळलेला थर हलक्या हाताने काढून टाका. कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. [Photo credit – Freepik]

  • 7/7

    या फेसपॅकपैकी केवळ तांदुळाचे पीठ आणि अंड्याचा फेसपॅकचा वापर आठवड्यातून एकदा करू शकतो. इतर सर्व फेसपॅक आठवड्यातून २ किंवा ३ वेळेस वापरू शकता. [टीप – हे घरगुती उपाय प्राप्त माहितीवर आधारित आहे.]

TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksब्यूटी टिप्सBeauty Tipsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsस्कीन केअर टिप्सSkin Care Tipsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How to get rid of facial hair at home try these four rice flour face mask follow simple steps dha

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.