-
Summer Makeup Tips: प्रत्येक मुलीला मेकअप करायला आवडतो, काहीजण मेकअप केल्याशिवाय घराच्या बाहेरच पडत नाही. उन्हाळ्यात मेकअप करणे सोपे काम नाही. (फोटो : Freepik)
-
कारण उन्हाळ्यात घामामुळे हा मेकअप बरेचदा खराब होतो. हे टाळण्यासाठी, वॉटरप्रूफ मेकअप हा एक उत्तम पर्याय आहे, जो हवामानाच्या परिस्थितीचा सामना करताना बाहेरच्या वातावरणातही आपला मेकअप व्यवस्थित ठेवतो. (फोटो : Freepik)
-
अशा परिस्थितीत, आपल्याला काही उन्हाळ्यातील मेकअप हॅकबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे, ज्याच्या मदतीने आपण उन्हात आणि घामातही आपला लूक ताजे ठेवू शकता. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात मेकअप कसा परफेक्ट ठेवता येईल.(फोटो : Freepik)
-
तुम्ही तुमच्या कॉम्पॅक्ट फाउंडेशनसह सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. यासाठी कोणताही जुना लिक्विड फाउंडेशन बॉक्स घ्या आणि त्यात फाऊंडेशनसोबत सनस्क्रीन मिक्स करा. (फोटो : Freepik)
-
मॉइश्चरायझर लावल्यानंतर प्रायमर लावायला विसरू नका. यामुळे तुमचा मेकअप जास्त काळ त्वचेवर टिकून राहण्यास मदत होईल. (फोटो : Freepik)
-
प्राइमर तुमच्या मेकअपसाठी एक गुळगुळीत बेस तयार करतो, त्यामुळे मेकअप जास्त काळ टिकतो. पाण्याच्या संपर्कात असतानाही तुमचा मेकअप व्यवस्थित राहतो.(फोटो : Freepik)
-
मेकअप प्रोडक्ट खरेदी करताना वॉटरप्रूफ प्रोडक्टची निवड करा. वॉटरप्रूफ मस्करा, आयलाइनर आणि फाउंडेशन पाण्याच्या किंवा घामाच्या संपर्कात असतानाही चिकटत नाही. (फोटो : Freepik)
-
सर्वात जास्त काळजी चेहऱ्यावर बेस मेकअप करताना घेतली पाहिजे. उन्हाळ्यात मेकअप लाइट पातळ लेअरचा बेस असला पाहिजे. (फोटो : Freepik)
-
घाम आल्यावर चेहरा पुसण्यासाठी टिश्यू किंवा रुमाल वापर. टिश्यु किंवा रुमालाने अलगद घाम पुसा. चेहऱ्यावर अजिबात टिशु किंवा रुमाल घासू नका. (फोटो : Freepik)
Summer Makeup: उन्हाळ्यातही असा करा परफेक्ट मेकअप, जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
Summer Skin Tips: काही उन्हाळ्यातील मेकअप हॅकबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे, ज्याच्या मदतीने आपण उन्हात आणि घामातही आपला लूक ताजे ठेवू शकता. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात मेकअप कसा परफेक्ट ठेवता येईल.
Web Title: Makeup tips for people with oily skin during summers summer makeup tips srk