Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. karishma kapoor lost 25 kilo weight by eating fish curry with rice secret diet routine to eat carbs but still loose kgs rujuta diwekar mantra svs

करिश्मा कपूर रात्रीच्या जेवणात भाताबरोबर खायची ‘हा’ पदार्थ; २५ किलो वजन कमी करण्याचं सिक्रेट डाएट केलं शेअर

Karishma Kapoor Diet: अनेकांना असं वाटतं की हे सेलिब्रिटी तर उगाच वाढवून सांगतात यांचं डाएट म्हणजे आपल्याला झेपणार नाही, नुसती फळं खाऊन वगैरे राहताच येणार नाही, पण करिश्मा कपूरचं डाएट तुम्हाला नक्कीच थक्क करेल.

Updated: April 3, 2024 10:18 IST
Follow Us
  • Karishma Kapoor Lost 25 Kilo Weight by Eating Fish Curry With Rice Secret Diet Routine
    1/9

    Karishma Kapoor Lost 25 Kgs: २०१५ मध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने आहारात अगदी साधे- सोपे बदल करत एक दोन नव्हे तर चक्क २५ किलो वजन कमी केल्याचे एका व्हिडिओमध्ये सांगितले होते

  • 2/9

    रुजुता दिवेकर यांनी आपल्या अधिकृत युट्युब चॅनेलवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये करिश्माने सांगितले होते की, “मी रोज रात्री मच्छीचा सार व भात खाऊन २५ किलो वजन कमी केलं. मी जेव्हा माझ्या मैत्रिणींना सांगते तेव्हा सर्व मला विचारतात की रात्रीच्या वेळी कार्ब्स खाऊन वजन कमी करणं कसं शक्य आहे. पण तू (रुजुता) मला आवडीचे पदार्थ कसे खावेत हे शिकवलं आहेस.

  • 3/9

    करिश्मा पुढे म्हणाली की, मला असं वाटतं की लोकांनी स्वतःला उपाशी ठेवू नये, लिंबू आणि कसलीतरी पानं घालून पाणी प्यायल्याने कदाचित वजन कमी होईल पण ते पुन्हा वेगाने वाढूही शकतं. त्यामुळे वजन कमी करतानाच पद्धत लक्षात घेणं गरजेचं आहे

  • 4/9

    पुढे करिश्माने तिच्या आवडत्या नाष्ट्याविषयी सांगितले की, “भरपूर मिरच्या घातलेले पोहे मला खूप आवडतात. आपल्याला अनेकदा वजन कमी करायचं म्हणजे उकडलेल्या भाज्या, गाजर, काकडी एवढंच खायला मिळेल असं वाटतं पण तुम्ही घरगुती पदार्थ खाऊन सुद्धा फिटनेस राखू शकता

  • 5/9

    केळी व चिकूसारखी फळं जी सहसा वजन वाढवण्यासाठी म्हणून ओळखली जातात ती तुम्हाला तणावात असताना किंवा कामात गुंतलेले असताना ऊर्जा देण्याचे काम करतात. याने पोट भरल्यासारखे वाटून वारंवार खाण्याचे प्रमाण कमी होते.

  • 6/9

    करिश्मा कपूरच्या या आहाराविषयी पोषणतज्ज्ञ नुपूर पाटील यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, रात्रीच्या जेवणासाठी घरगुती मच्छीचा सार व भात खाणे शिस्तीचे वर्तन दाखवते. मात्र याच पद्धतीचा आहार प्रत्येकाला फायद्याचा ठरेल असे नाही, व्यक्तिपरत्वे पदार्थांचा प्रभाव बदलत असतो

  • 7/9

    नुपूर पाटील यांनी नमूद केले की, भाज्यांचे सेवन वाढवणे, प्रथिनांचा पातळ स्त्रोत निवडणे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ व साखरयुक्त पेये कमी करणे यासारख्या बदलांचा एकूण आरोग्याला हातभार लागू शकतो

  • 8/9

    दुसरीकडे, डॉ विकास जिंदाल, सल्लागार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग, सीके बिर्ला हॉस्पिटल दिल्ली यांनी सांगितले की, “खूप तेलकट पदार्थ खाणे टाळा आणि साखर नसलेल्या पदार्थांमध्ये सुद्धा काही वेळा कृत्रिम गोडवा आणला जातो याकडे सुद्धा लक्ष द्या.”

  • 9/9

    डॉ. चावला यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “कार्बोनेटेड शीतपेये, तसेच काही फळे जसे की सफरचंद, नासपती यात आढळणारे फ्रुक्टोज तुमच्या पोटात अधिक हवा भरतात. त्यामुळे याकडे लक्ष द्यायला हवे.” (सर्व फोटो: इन्स्टाग्राम/@करिश्मा कपूर)

TOPICS
करिश्मा कपूरKarishma KapoorमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Karishma kapoor lost 25 kilo weight by eating fish curry with rice secret diet routine to eat carbs but still loose kgs rujuta diwekar mantra svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.