• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. skin care tips for summer 4 reasons why moong dal can be your best beauty buddy srk

Moong Daal Scrub: मूग डाळीपासून बनवा फेस स्क्रब; चेहऱ्यावर चमक हवी तर करा १० मिनिटांचा सोपा उपाय…

Skin Care: मूगडाळ प्रत्येकाच्या घरी आढळते. आरोग्याच्या दृष्टीने मूगडाळ अत्यंत पौष्टिक आणि पचण्याजोगी आहे. पण तुम्हाला माहित आहे का की मूगडाळ तुमच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करते.

April 17, 2024 18:27 IST
Follow Us
  • Moong Dal Can Be Your Best Beauty Buddy
    1/9

    Skin Care Tips for summer : चेहऱ्यावर एक पिंपल दिसला तरी आपल्याला टेंशन येतं. उन्हाळ्याच्या हंगामात पिंपल्स, चिकटपणा आणि डाग सामान्य आहेत. (Photo: Freepik)

  • 2/9

    अशा परिस्थितीत, लोक खूप अस्वस्थ होतात आणि त्यातून सुटका करण्यासाठी बरेच प्रयत्न करतात. पण त्यांना आराम मिळत नाही, जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.(Photo: Freepik)

  • 3/9

    आज आम्ही तुम्हाला या लेखातून असा एक रामबाण उपाय सांगणार आहोत जो तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करून तुम्हाला अधिक चांगले सौंदर्य देऊ शकतो.(Photo: Freepik)

  • 4/9

    मूग डाळीचा वापर त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि मुरुम कमी करण्यासाठी मदत करते. तुम्ही मूग डाळ वापरून स्क्रब बनवू शकता. (Photo: Freepik)

  • 5/9

    मूग डाळीचा स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य. मुग डाळ, मध, दही. (Photo: Freepik)

  • 6/9

    तुम्ही मूग डाळीपासून स्क्रब बनवू शकता. यासाठी तुम्हाला मूग डाळ स्वच्छ धुवावी. नंतर रात्री पाण्यात भिजत ठेवावी.(Photo: Freepik)

  • 7/9

    नंतर सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि नंतर दोन चमचे मूग डाळीमध्ये एक चमचा दही आणि एक चमचा मध घाला.(Photo: Freepik)

  • 8/9

    ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. यानंतर तुम्ही चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावू शकता.(Photo: Freepik)

  • 9/9

    असे आठवड्यातून १ ते २ वेळा करा. यामुळे चेहरा चमकदार दिसेल. काही लोकांना मूग डाळ वापरल्यास अॅलर्जी असू शकते. चेहऱ्यावर लाल रॅशेस, पिंपल्स किंवा ॲलर्जीसारखे काही दिसले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.(Photo: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsस्कीन केअरSkin Careस्कीन केअर टिप्सSkin Care Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Skin care tips for summer 4 reasons why moong dal can be your best beauty buddy srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.