-
आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यामध्ये आपले आहार महत्त्वाची भूमिका बजावतात. काही आहारातील खाद्यपदार्थ यकृताचे कार्य सुधारण्यास आणि आपल्याला यकृताच्या आजारांपासून वाचवण्यासाठी मदत करतात.
-
या पदार्थांमध्ये पौष्टिकतेचे प्रमाण जास्त असून हे आपल्याला असंख्य आरोग्य फायदे ही देतात. जाणून घेऊया अशा पदार्थांबद्दल जे आपल्या यकृतासाठी फायदेशीर आहेत.
-
लसणामध्ये ऍलिसिन आणि सेलेनियम सारखी संयुगे असतात, जी शरीरातुन विषारी पदार्था बाहेर काढण्यासाठी मदत करतात. यामधील अँटिऑक्सिडेंट गुणधर्म यकृताला ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवतात.
-
बीटरूटमध्ये ‘बेटेन’ हे एक संयुग आढळते जे यकृताच्या डिटॉक्सिफिकेशनला प्रोत्साहन देते आणि पोटात होणारी जळजळ कमी करण्यास मदत करते. यामध्ये बीटालेन्ससारखे अँटीऑक्सिडंट देखील असतात, जे यकृताच्या पेशींचे रक्षण करतात.
-
ब्रोकोली, स्प्राउट्स, आणि कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये ‘ग्लुकोसिनोलेट्स’ नावाची संयुगे असतात, जी यकृताच्या डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेस समर्थन देतात. हे आपल्या शरीरात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स देखील प्रदान करतात जे आपल्या यकृताला निरोगी ठेवतात.
-
अक्रोड हे ओमेगा-3 फॅटी ऍसिडचा एक चांगला स्रोत आहे, यामधील दाहक-विरोधी गुणधर्म यकृतासाठी फायदेशीर असतात. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि पॉलीफेनॉलसारखे अँटिऑक्सिडंट देखील असतात, जे यकृताच्या पेशींचे रक्षण करतात.
-
एवोकॅडो मध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळतात जे आपल्या यकृताला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. यामध्ये असलेले ग्लूटाथिओन सारखे अँटीऑक्सिडंट यकृताच्या डिटॉक्सिफिकेशनला समर्थन देते.
-
माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् भरपूर असतात आणि यामधील दाहक-विरोधी गुणधर्म यकृतामध्ये फट्स जमा होण्यास मदत करतात. हा प्रथिने आणि व्हिटॅमिन डी चा एक चांगला स्त्रोत देखील आहे जे संपूर्ण यकृताला निरोगी ठेवते.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
( सर्व फोटो : Unsplash)
LIVER HEALTH: यकृत निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा समावेश नक्की करा
काही खाद्यपदार्थांमध्ये पौष्टिकतेचे प्रमाण जास्त असल्याने हे आपल्याला असंख्य आरोग्य फायदे देतात. जाणून घेऊया अशा पदार्थांबद्दल जे आपल्या यकृतासाठी फायदेशीर आहेत.
Web Title: Liver health include these foods in your diet to keep your liver healthy arg 02