-
आपल्या आहारांमध्ये अनेकदा कांद्याचे समावेश असते आणि यामुळे आपल्याला अनेक आरोग्य फायदे देखील होतात.
-
जाणून घेऊया कांद्यापासून होणाऱ्या आरोग्य फायद्यांबद्दल.
-
कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे कांद्याचे सेवन तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम फायदेशीर आहे. इतकेच नाही तर कांदा अत्यंत पौष्टिक असल्यामुळे आपल्याला मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोगाच्या धोक्या पासून वाचवते.
-
कांद्याचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या अनेक अँटिऑक्सिडंट तयार होतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
-
तुम्हाला मधुमेह असल्यास, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही कांद्याचे सेवन करू शकता. कांद्यामधील ‘फ्लेव्होनॉइड्स’ रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यासाठी मदत करते.
-
कांद्यामध्ये प्रीबायोटिक्स आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. ही संयुगे शरीरातील पचनास मदत करून, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतात.
-
कांद्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळतात हे सल्फर, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्ससह उपयुक्त असते.
-
तज्ञांच्या मते कांद्याचे सेवन केल्याने कोलोरेक्टल आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका देखील कमी होतो. (Photos: Unsplash)
Healthy Living: पचनक्रिया मजबूत करण्यापासून ते रक्तदाब कमी करण्यासाठी ‘कांदा’ आहे आरोग्यासाठी गुणकारी
आपल्या आहारांमध्ये अनेकदा कांद्याचे समावेश असते आणि यामुळे आपल्याला अनेक आरोग्य फायदे देखील होतात. जाणून घेऊया कांद्यापासून होणाऱ्या आरोग्य फायद्यांबद्दल.
Web Title: Healthy living from curing digestion to slowing down high blod pressure onion has alot of health benefits arg 02