• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. this is what happens when you chew cloves everyday know from expert pdb

तुम्ही रोज एक-दोन लवंग चघळल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

छोटेसे लवंग अनेक लोक चघळत असतात, परंतु रोज एक-दोन लवंग चघळल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? तुम्हाला माहिती आहे का? मग लगेच जाणून घ्या…

Updated: May 9, 2024 18:07 IST
Follow Us
  • लवंग (Cloves) आपल्या घरात आढळणारी एक सामान्य गोष्ट आहे. दैनंदिन आहारात बरेचसे पदार्थ हे लवंगीशिवाय अपुरे आहेत म्हणून प्रत्येक घरात लवंग आढळतेच.
    1/12

    लवंग (Cloves) आपल्या घरात आढळणारी एक सामान्य गोष्ट आहे. दैनंदिन आहारात बरेचसे पदार्थ हे लवंगीशिवाय अपुरे आहेत म्हणून प्रत्येक घरात लवंग आढळतेच.

  • 2/12

    मसाल्यांमधील लवंग ही औषधी आणि महत्त्वपूर्ण घटकांनी भरलेली असून ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

  • 3/12

    लवंग मसाल्याप्रमाणे काही गोडाच्या पदार्थांमध्ये देखील वापरली जाते. लवंग दिसायला अगदी छोटी असली तरी तिचे औषधी गुणधर्म अतिशय मोठे आहेत.

  • 4/12

    पण रोज एक-दोन लवंग चघळल्या तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? तुम्हाला माहिती आहे का? याच विषयावर डॉ. रुपी औजला यांनी इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे, त्याबाबत जाणून घेऊया…

  • 5/12

    शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. लवंगचे सेवन केल्याने इंफेक्‍शन आणि सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून आराम मिळू शकतो.

  • 6/12

    लवंगात युजेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे फ्री रॅडिकल्स, हृदय, मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी करते.

  • 7/12

    लवंगाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे पोटदुखी, गॅस, अपचन यासारख्या समस्या दूर होतात. यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वांमुळे पचनाला मदत होते.

  • 8/12

    लवंगाच्या सेवनामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. लवंगामध्ये जीवाणूविरोधी गुणधर्म असतात, जे तोंडातील सूक्ष्म बॅक्टेरिया नष्ट करतात, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते.

  • 9/12

    जळजळ आणि बॅक्टेरियाची वाढ कमी करून, लवंग निरोगी हिरड्या निर्माण करण्यात योगदान देऊ शकते, हिरड्यांच्या आजारांच्या वाढीस प्रतिबंध किंवा मंद करू शकते.

  • 10/12

    रोज एक ते दोन लवंग अशा थोड्या प्रमाणात वापरणे फायदेशीर ठरू शकते. आरोग्याच्या फायद्यासाठी तुम्ही लवंगाचा वापर चहा, भाजलेल्या पदार्थांमध्ये किंवा आहारामध्ये करु शकता.

  • 11/12

    गर्भवती महिला, यकृताचा आजार असलेल्या व्यक्ती आणि रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्यांनी लवंग सावधपणे आणि वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावी.

  • 12/12

    (फोटो सौजन्य : freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: This is what happens when you chew cloves everyday know from expert pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.