-
रंगीत, कलरफुल हेअर कलर सध्या बरेच ट्रेंडमध्ये आहेत. हेअर कलर केल्याने काही मिनिटांतच तुमचा लूक बदलतो शिवाय तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढतो.ज्यांचे केस पांढरे नाहीत, त्यांनाही वेगवेगळ्या शेड्स देऊन केसांना नवा लुक द्यायचा आहे. (Photo: Freepik)
-
यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. पण त्यात भरपूर रसायने असतात. त्यामुळे अनेक वेळा तुमचे केस खराब होतात. काही केसांचे रंग इतके हार्ड असतात की ते तुमच्या टाळूला इजा करू शकतात.(Photo: Freepik)
-
त्यामुळे केस मुळापासून कमकुवत होऊन गळू लागतात. जर तुम्हाला या सर्व समस्या टाळायच्या असतील तर केसांना कलर करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.(Photo: Freepik)
-
केसांना कोणताही रासायनिक रंग लावण्यापूर्वी टाळूवर कलर करणे टाळा. जर रंग तुमच्या टाळूमध्ये शोषला गेला आणि तुमच्या रक्तप्रवाहात मिसळला गेला तर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.(Photo: Freepik)
-
तुमच्या केसांवर केमिकल हेअर डाय वापरण्याची ही तुमची पहिलीच वेळ असल्यास, नेहमी तुमच्या केसांच्या छोट्या भागावर त्याची चाचणी करा. जर ते तुम्हाला खाज सुटणे, जळजळअशा कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही हेअर डाई वापरू नये. (Photo: Freepik)
-
केसांना हायलाइट करण्यासाठी अनेक रसायने वापरली जातात, ज्यामुळे केस कमकुवत आणि कोरडे होतात. केसांना पुन्हा-पुन्हा हायलाइट केल्याने केस गळतात आणि नवीन केस वाढण्यास त्रास होतो.(Photo: Freepik)
-
जर तुम्हाला तुमचे केस हलके काळे रंगवायचे असतील तर तुम्हाला ब्लीचिंग करावे लागेल. ब्लीचिंग केसांसाठी जास्त धोकादायक मानले जाते. (Photo: Freepik)
-
इतकेच नाही तर काही लोकांना केस हायलाइट केल्यानंतर जळजळ, लालसरपणा आणि टाळूला खाज सुटणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये असलेल्या रसायनांमुळे ऍलर्जी होते.(Photo: Freepik)
-
घरी केस हायलाइट करू नका, कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. हायलाइट केलेल्या केसांची काळजी घ्या आणि शॅम्पू वापरा. केस हायलाइट करण्याआधी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.(Photo: Freepik)
Shani Gochar 2025: शनीच्या साडेसाती आणि ढैय्येपासून ५ राशींना मिळणार सुटका, करिअरमध्ये घेणार मोठी झेप, वर्षभर होईल पैशांचा पाऊस