• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why do we drink matka water in summer read benefits of water in earthen pot ndj

Matka Water In Summer : उन्हाळ्यात माठातील पाणी का पितात? जाणून घ्या मडक्यातील पाणी पिण्याचे फायदे

माठातील थंडगार पाणी चवीला खूप चांगले असते. खरंच हे पाणी लवकर तहान भागवते का? शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यात मदत करते का? द इंडियन एक्स्प्रेसनी काही तज्ज्ञांच्या हवाल्याने या संदर्भात माहिती सांगितली आहे.

June 9, 2024 16:04 IST
Follow Us
  • Matka Water In Summer
    1/9

    उन्हाळा आला की घरोघरी मातीची मडकी दिसतात. अनेक जण फ्रिजचे पाणी पितात, पण काही लोकांना माठातील थंडगार पाणी प्यायला आवडते. उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरी मातीचे मडके दिसते. असं म्हणतात की, माठातील थंडगार पाणी चवीला खूप चांगले असते. (Photo : Loksatta)

  • 2/9

    खरंच हे पाणी लवकर तहान भागवते का? शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यात मदत करते का? न्यूट्रिशनिस्ट रश्मी मिश्रानी याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. (Photo : Loksatta)

  • 3/9

    द इंडियन एक्स्प्रेसनी काही तज्ज्ञांच्या हवाल्याने या संदर्भात माहिती सांगितली आहे. मातीच्या मडक्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये नैसर्गिकरित्या पाणी थंड होते. (Photo : Loksatta)

  • 4/9

    बंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी येथील मदरहूड हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ सल्लागार रिनू दुबे सांगतात, “मातीच्या मडक्यांना सूक्ष्म अशी छिद्रे असतात. त्यामुळे मडक्याच्या पृष्ठभागावरील पाण्याचे बाष्पीभवन होते आणि पाणी नैसर्गिकरित्या आतून थंड होते.” (Photo : Loksatta)

  • 5/9

    माठातील पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते असे दुबे म्हणतात. “खूप जास्त थंड पाणी रक्तवाहिन्या घट्ट करतात आणि त्यामुळे पचनक्रिया मंदावते, पण माठातील पाणी कमी प्रमाणात थंड असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते”, असे दुबे सांगतात. (Photo : Instagram)

  • 6/9

    त्या पुढे म्हणतात, “मडक्यातील पाणी थोडे अल्कलाइन असते, म्हणजेच त्या पाण्याची पीएच पातळी सातपेक्षा जास्त असते, त्यामुळे ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ वाटणे इत्यादी समस्या माठातील पाणी प्यायल्याने कमी होतात.” (Photo : Loksatta)

  • 7/9

    प्लास्टिक आणि मेटलच्या भांड्यापेक्षा मातीचे मडके पर्यावरणपूरक असतात. जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत एचएस सांगतात, “माठातील पाण्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण कमी होते आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचे उत्पादन आणि पुनर्वापरसुद्धा टाळता येतो.” (Photo : Loksatta)

  • 8/9

    “माठातील पाणी पिण्याचे अनेक फायदे असले तरी हे पाणी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकतात, असे वर्षानुवर्षांपासून मानले जाते. पण, हा दावा सिद्ध करणारे मर्यादित वैज्ञानिक पुरावे आहेत. माठातील पाण्याची चव ही हायड्रेशनला अधिक प्रोत्साहन देते, जे अप्रत्यक्षपणे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य जपण्यास मदत करते”, असे दुबे पुढे सांगतात. (Photo : Loksatta)

  • 9/9

    डॉ. श्रीकांत सांगतात, “माठातील पाण्यामध्ये नैसर्गिकरित्या फिल्टर केलेले अँटिऑक्सिडंट गुण असतात. हे अँटिऑक्सिडंट गुण ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास आणि आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.” (Photo : Loksatta)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Why do we drink matka water in summer read benefits of water in earthen pot ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.