-
तुम्ही कोणती टूथपेस्ट वापरता? आपल्यापैकी अनेकांना वाटू शकते की, सर्व टूथपेस्ट एकसारखे असतात आणि सुरक्षितसुद्धा असतात. खरंच तुम्ही वापरत असलेली टूथपेस्ट तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी चांगली आहे का? बऱ्याच टूथपेस्टमध्ये एक सामान्य घटक असतो, तो म्हणजे सोडियम लॉरील सल्फेट (Sodium Lauryl Sulfate) ज्याचे फायदे कमी, पण तोटे जास्त आहेत. (Photo : Freepik)
-
निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. जॅनिन बोअरिंग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या सांगतात, “सोडियम लॉरील सल्फेट समाविष्ट असलेली टूथपेस्ट कधीही वापरू नका; तुमच्या टूथपेस्टचे लेबल तपासा.” (Photo : Freepik)
-
कोलकाता येथील डेंटल इम्प्लांटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डेंटिस्ट, मॅक्सिलोफेशियल सर्जन आणि कोलकाता येथील एस्थेटिक क्लिनिकचे संचालक डॉ. कमलेश कोठारी सांगतात, “सोडियम लॉरील सल्फेट (SLS) हे एक डिटर्जंट आणि सर्फेक्टंट आहे, जे सहसा वैयक्तिक काळजी घेताना आणि घरगुती किंवा सार्वजनिक स्वच्छता करताना वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये असते. हे दात आणि हिरड्यांमधून घाण काढून टाकण्यास मदत करतात. तरीसुद्धा काही लोकांना सोडियम लॉरील सल्फेटमुळे चिडचिड जाणवू शकते, म्हणून सोडियम लॉरील सल्फेट समाविष्ट नसलेले अनेक टूथपेस्ट पर्याय म्हणून बाजारात उपलब्ध आहेत.” (Photo : Freepik)
-
डॉ. कोठारी सांगतात, “सोडियम लॉरील सल्फेटयुक्त टूथपेस्ट वापरल्याने काही व्यक्तींना चिडचिड किंवा सेन्सिटिव्हीटी जाणवू शकते, सोडियम लॉरील सल्फेटमुळे तोंडाच्या आतील त्वचेला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे तोंडामध्ये फोड येऊ शकतो किंवा कोरडेपणा जाणवू शकतो.” (Photo : Freepik)
-
ते पुढे सांगतात, “क्वचितप्रसंगी काही लोकांना याची ॲलर्जी असू शकते. अंगावर सूज येणे किंवा खाज सुटणे इत्यादी गंभीर लक्षणे जाणवू शकतात. सोडियम लॉरील सल्फेट कर्करोगजन्य असल्याचे काही अभ्यासात सांगितले आहे, पण सोडियम लॉरील सल्फेटचा कर्करोगाशी संबंध असलेला असा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.” (Photo : Freepik)
-
यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA), युरोपियन मेडिसिन एजन्सी (EMA) आणि कॉस्मेटिक इंग्रेडियंट रिव्ह्यू (CIR) यासह प्रमुख आरोग्य आणि नियामक संस्थांनी SLS च्या सुरक्षिततेविषयी मत मांडले आहे. (Photo : Freepik)
-
“सोडियम लॉरील सल्फेटमुळे दातांमध्ये त्रास वाढू शकतो आणि सेन्सिटिव्ह दात किंवा हिरड्या असलेल्या व्यक्तींना आणखी त्रास होऊ शकतो. यामुळे हिरड्यांमध्ये लालसरपणा किंवा सूज येणे आणि अस्वस्थता जाणवणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात”, असे डॉ. कोठारी सांगतात. (Photo : Freepik)
-
सोडियम लॉरील सल्फेट नसलेले टूथपेस्ट निवडा. त्यासाठी टूथपेस्ट खरेदी करताना त्यावरील लेबल तपासा.सतत दातांचा किंवा हिरड्यांचा त्रास होत असेल तर या विषयी डेंटिस्टचा सल्ला घ्या. ते तुम्हाला तुमच्या दातांच्या गरजेनुसार योग्य टूथपेस्टचा सल्ला देऊ शकतात.दातांचा त्रास होऊ नये म्हणून दातांची आणि तोंडाची नीट स्वच्छता राखा. (Photo : Freepik)
-
“डाबर रेड पेस्ट, विको वज्रदंती, बेंटोडेंट यांसारख्या काही टूथपेस्ट आणि सेन्सोफाइन, मामाअर्थ आणि परफोरा या कंपन्यांच्या टूथपेस्टमध्ये सोडियम लॉरील सल्फेट नसते”, असे डॉ. कोठारी सांगतात. (Photo : Freepik)
तुमची टूथपेस्ट खरंच सुरक्षित आहे का, कसं ओळखाल?
खरंच तुम्ही वापरत असलेली टूथपेस्ट तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी चांगला आहे का?
Web Title: Which toothpaste you use really your toothpaste is safe how to identify know why expert said never use sls containing toothpaste ndj