• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. skin care ladyfinger face pack benefits of ladyfinger face pack for glowing and soft skin srk

Skin care: त्वचेवर रोज लावा भेंडीचं पाणी, फरक पाहून विश्वास बसणार नाही

Skin care: अनेकांना भेंडीची भाजी आवडत नाही मात्र भेंडी जशी आरोग्यासाठी चांगली असते तशीच चेहऱ्यासाठीही असते.

July 15, 2024 18:28 IST
Follow Us
  • Ladyfinger Face Pack Benefits Of Ladyfinger Face Pack
    1/9

    Ladyfinger Face Pack: कोणत्याही ऋतूमध्ये आरोग्याचीच नव्हे तर, त्वचेचीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आपली त्वचा ही अनेक थरांनी बनलेली असते या थरांमध्ये नवे नव्या पेशी सतत बनत असतात आणि नष्ट होत असतात. (Photo: Freepik)

  • 2/9

    यावेळी निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी बरेच लोक फेसमास्क वापरतात. परंतु, फेसमास्क लावताना काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे असते. कधीकधी आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. अशा परिस्थितीत हे फेस मास्क त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात.(Photo: Freepik)

  • 3/9

    जर तुम्हीही तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डागांमुळे त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला भेंडीच्या वापराविषयी सांगणार आहोत. याचा वापर करून तुम्ही तुमचा चेहरा चमकदार आणि डागरहित करू शकता.(Photo: Freepik)

  • 4/9

    चेहऱ्यावर भेंडी वापरण्यासाठी तुम्ही त्याचा फेस पॅक बनवू शकता. फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला १० ते १२ भेंडी धुवून वाळवाव्या लागतील, नंतर त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घट्ट पेस्ट बनवावी लागेल. आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर २० मिनिटांसाठी लावा. थोडे कोरडे झाल्यावर पाण्याने धुवा.(Photo: Freepik)

  • 5/9

    तुम्ही घरी भेंडीचं पाणी देखील बनवू शकता. यासाठी तुम्हाला १० भेंडी धुवून त्याचे छोटे तुकडे करावे लागतील, नंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस काढा. त्यात थोडे पाणी मिसळा, जेणेकरून ते पातळ होईल, मग तुम्ही ते स्प्रे बाटलीत भरून चेहऱ्याला लावू शकता.(Photo: Freepik)

  • 6/9

    भेंडीचं तेल बनवण्यासाठी, तुम्हाला १० ते १२ भेंडी धुवून वाळवाव्या लागतील, नंतर त्यांचे लहान तुकडे करा आणि त्यांना तेलात सोनेरी होऊ द्या. ते थंड झाल्यावर गाळून त्यात खोबरेल तेल टाका.(Photo: Freepik)

  • 7/9

    ७ ते ८ भेंडी घ्या, धुवून स्वच्छ करा नंतर मिक्सरमध्ये बारीक करा आणि त्यात दही आणि ऑलिव्ह ऑइल घालून पेस्ट बनवा. आपण त्यात थोडे पाणी घालू शकता. आता हा फेस पॅक १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा, काही वेळाने धुवा.(Photo: Freepik)

  • 8/9

    भेंडी खाण्यासाठी स्वादिष्ट असण्यासोबतच त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के सारखे पोषक घटक आढळतात, जे आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही भेंडीचा फेस पॅक वापरत असाल तर तुमच्या चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग कमी होतील आणि त्वचेही हायड्रेट होईल.(Photo: Freepik)

  • 9/9

    याशिवाय चेहऱ्यावर भेंडी लावल्याने सुरकुत्या आणि रेषा कमी होतात आणि त्वचा मुलायम होते. भेंडीचा फेस पॅक वापरण्यापूर्वी, पॅच टेस्ट करा कारण काही लोकांना त्याची ॲलर्जी असू शकते.(Photo: Freepik)

TOPICS
स्कीन केअरSkin Careस्कीन केअर टिप्सSkin Care Tipsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Skin care ladyfinger face pack benefits of ladyfinger face pack for glowing and soft skin srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.