-
भात हा आपल्या जेवणातील महत्वाचा पदार्थ आहे. भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही असं अनेक जण म्हणतात. (फोटो सौजन्य: @Pixbay)
-
पण, भातामुळे मधुमेह वाढेल या भीतीने जगभरातील मधुमेही रुग्णांना त्यांच्या नियमित आहारात भाताचा समावेश करण्यास प्रतिबंध घातला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर यावर एक उपाय सांगण्यात आला आहे ; तो म्हणजे भातावर तूप घालून खाणे ; जो तुम्हाला मधुमेहाचा सामना करण्यास मदत करेल. (फोटो सौजन्य: @Freepik / Pixabay )
-
दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला आणि ही ट्रिक कोणती, कशा पद्धतीने कार्य करेल, यादरम्यान कोणते तोटे उदभवू शकतात हे त्यांनी समजावून सांगितले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
एमआरसी आणि पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ स्वीडल त्रिनिडेड म्हणाल्या, “भातात तूप घातल्याने जेवणाचा ग्लायसेमिक इंडेक्स तात्त्विकदृष्ट्या सुधारतो; पण ग्लायसेमिक भार वाढतो.” त्यांच्या मते, तुपात फॅटी ॲसिडचे घटक असतात; जे कार्बोहायड्रेट्सचे पचन मंद करून, रक्तातील साखरेची पातळी कमी करते. तर भातात तूप मिसळल्याने त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होऊ शकतो; ज्यामुळे तो उर्जेचा स्रोत ठरू शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तूप हा चरबीमध्ये विरघळणाऱ्या ए, डी, ई व के या जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे; जे भाताबरोबर खाल्लेल्या इतर पदार्थांमधील पोषक घटकांचे शोषण वाढवू शकते. तुपामध्ये Butyrate, एक शॉर्ट-चेन फॅटी ॲसिडदेखील आहे; जे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. निरोगी आतडे तुमचे चयापचय आरोग्य सुधारू शकते; ज्यामुळे अप्रत्यक्षपणे रक्तातील साखरेच्या व्यवस्थापनास फायदा होतो, असे बंजारा हिल्स, हैदराबाद येथील केअर हॉस्पिटलच्या क्लिनिकल डाएटीशियन सुषमा यांनी सांगितले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
या ट्रिकला सगळ्यांनी फॉलो करावे का? क्लिनिकल डाएटीशियन सुषमा म्हणाल्या की, हे सर्वांसाठी योग्य असू शकत नाही; विशेषतः ज्यांना अनियंत्रित मधुमेह आहे. तुपात चरबीचे प्रमाण जास्त असते; ज्यामुळे लोक उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाच्या आरोग्याशी संबंधित समस्यांना बळी पडतात, असे स्वीडल त्रिनिडेड म्हणाले आहेत. भातात तूप घातल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढते. मग संभाव्य वजन व्यवस्थापनात आणि तुमच्या कॅलरीज बर्न करण्यामध्येही अडथळे निर्माण होतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे कारण- तुपाचे जास्त सेवन त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. ज्या लोकांना दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी आहे, त्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कारण- तूप हा दुग्धजन्य पदार्थ आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
भातात तूप घालण्याचे प्रमाणही ठरवले पाहिजे. एक मार्गदर्शक तत्त्व म्हणजे शिजवलेला भात ताटात वाढताना एक चमचा तूप घालणे (शिजविलेला भात सुमारे १/२ कप ) असे डाएशियन सुषमा म्हणाल्या आहेत. (फोटो सौजन्य: @Pixbay)
Adding Ghee To Rice: तुम्हीसुद्धा भातावर तूप घालून खाताय का? मग आरोग्यदायी फायदे अन् तज्ज्ञांनी सांगितलेले हे तोटे नक्की वाचा
simple trick make rice safe for diabetics: भातामुळे मधुमेह वाढेल या भीतीने जगभरातील मधुमेही रुग्णांना त्यांच्या नियमित आहारात भाताचा समावेश करण्यास प्रतिबंध घातला जातो…
Web Title: Adding ghee to rice can improve the glycemic index of the meal simple trick make rice safe for diabetics know the benefits and disadvantages asp