Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you have habit of using headphone you may suffer disease rare sensory neural nerve hearing loss ndj

हेडफोन वापरताय? मग तुम्हाला होऊ शकतो हा गंभीर आजार? वाचा सविस्तर

Hearing Loss Disease : तुम्हाला या आजाराविषयी माहिती आहे का? हा दुर्मीळ आजार कोणाला होऊ शकतो? या आजारामागील कारणे काय आहेत? या विषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

July 25, 2024 21:58 IST
Follow Us
  • rare sensory neural nerve hearing loss disease
    1/9

    प्रसिद्ध बॉलीवूड गायिका अलका याग्निक यांनी मागील महिन्यात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांना एक दुर्मीळ आजार झाल्याची माहिती त्यांनी दिली होती. विषाणूच्या हल्ल्यामुळे त्यांना ‘रेयर सेंसरी न्यूरो नर्व हियरिंग लॉस’ आजार झाल्याचे समोर आले आहे. म्हणजेच अचानक त्यांना ऐकायला येणे बंद झाले. (Photo : Instagram)

  • 2/9

    तुम्हाला या आजाराविषयी माहिती आहे का? हा दुर्मीळ आजार कोणाला होऊ शकतो? या आजारामागील कारणे काय आहेत? या विषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)

  • 3/9

    पुणे येथील कान, घसातज्ज्ञ प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी लोकसत्ताशी संवाद साधताना सांगितले, “अचानक ऐकायला येणे बंद होणे यामागे खालील कारणे असू शकतात.
    १. व्हायरल इन्फेक्शन
    २. कानाला किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी करणे
    ३. मेंदूमध्ये गाठ असणे (Photo : Freepik)

  • 4/9

    प्रा. डॉ. मिलिंद भोई पुढे सांगतात, “उपचार करण्यापूर्वी एमआरआय ब्रेन आणि ऑडिओमेटरी म्हणजे ऐकण्याची क्षमता तपासावी. या टेस्ट केल्यानंतर आपल्याला अचूक कारण कळू शकते, त्यानुसार पुढचा उपचार आपण घेऊ शकतो.” (Photo : Freepik)

  • 5/9

    डॉ. मुरारजी घाडगे सांगतात, “हर्पस सिम्प्लेक्स, मिझलेस, मम्प्स आणि व्हेरिसेला-झोस्टर यांसारख्या विषाणूंमुळे (herpes simplex, measles, mumps, and varicella-zoster virus) वेगवेगळे संसर्ग होऊ शकतात. या विषाणूंचा ऐकून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे अचानक ऐकण्याची क्षमता कमी होते.” (Photo : Freepik)

  • 6/9

    डॉ. घाडगे म्हणाले, “विषाणूमुळे श्रवणशक्ती कमी झाली असेल तर उपचारामध्ये कॉर्टिकोस्टिरॉईड्सचा उच्च-डोस घेऊ शकता, ज्यामुळे कानात जळजळ वाटणे कमी होते आणि कानाच्या आतील सूज कमी होते. संसर्गजन्य आजाराचा संशय असल्यास अँटीव्हायरल औषधी फायदेशीर ठरू शकतात, पण त्याचा परिणाम होईलच असे नाही.” (Photo : Freepik)

  • 7/9

    डॉ. घाडगे सांगतात, “पहिल्या दोन आठवड्यांत सुमारे ३०-६० टक्के प्रकरणांमध्ये फरक दिसून येतो. काही रुग्णांमध्ये तीन महिन्यांनंतर फरक दिसून येतो, त्यामुळे लक्षणे दिसताच त्वरीत उपचार घेणे महत्त्वाचे आहे.” (Photo : Freepik)

  • 8/9

    डॉ. घाडगे सांगतात, संपूर्ण आरोग्याची काळजी घेणे, मोठ्या आवाजापासून कानांचे संरक्षण करणे, कानामध्ये कोणत्याही प्रकारचे संक्रमण होऊ नये म्हणून स्वच्छता पाळणे; याशिवाय संसर्गजन्य रोगांमुळे जर श्रवणशक्ती कमी होत असेल तर वेळेवर लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. (Photo : Freepik)

  • 9/9

    प्रा. डॉ. मिलिंद भोई सांगतात, “जे लोक सतत हेडफोन लावतात किंवा हेडफोन कानाला लावून झोपतात, त्यांच्या कानाच्या पडद्यावर तीव्र आवाजाचा थेट परिणाम होतो, ज्यामुळे कमी ऐकू येऊ शकते. जे लोक सतत कानावर हेडफोन लावतात, त्यांनी हेडफोन कमी वापरावे. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थHealthहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Do you have habit of using headphone you may suffer disease rare sensory neural nerve hearing loss ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.