• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. sugar intake how to find out that you eat excessive amounts of sugar or not ndj

Sugar Intake : तुम्ही गरजेपेक्षा जास्त साखरेचं सेवन करता का? कसे ओळखावे?

excessive sugar consumptions : तुम्हाला हे माहीत आहे का की, काही लक्षणांवरून तुम्ही जाणून घेऊ शकता की, तुम्ही खूप गोड खात आहात की नाही?

August 2, 2024 09:00 IST
Follow Us
  • Sugar Intake
    1/9

    अनेक लोकांना खूप गोड खायची सवय असते आणि अति गोड पदार्थांच्या सेवनामुळे त्यांना वजन वाढ आणि मधुमेह यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. पण, तुम्हाला हे माहीत आहे का की, काही लक्षणांवरून तुम्ही जाणून घेऊ शकता की, तुम्ही खूप गोड खात आहात की नाही? (Photo : Freepik)

  • 2/9

    सतत भूक लागणे आणि काहीतरी खावेसे वाटणे
    साखर ही आपल्या मेंदूला आणखी गोड खाण्यास उत्तेजित करते आणि यादरम्यान तुम्ही जर साखर खाल्ली, तर तुमची ऊर्जा अचानक वाढते आणि अचानक कमी होते; ज्यामुळे तुम्हाला आणखी गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. (Photo : Freepik)

  • 3/9

    कमी ऊर्जा आणि कमी झोप
    रक्तातील साखर वाढल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवू शकतो आणि आळस येऊ शकतो. एवढेच काय, तर साखर तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकते; ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळू शकणार नाही. (Photo : Freepik)

  • 4/9

    मूड बदलणे आणि चिडचिड होणे
    रक्तातील साखरेचे चढ-उतार तुमच्या मूडवर परिणाम करतात आणि त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. यातून तणाव आणि नैराश्याची लक्षणेसुद्धा दिसू शकतात. (Photo : Freepik)

  • 5/9

    आतड्याशी संबंधित समस्या
    खूप जास्त साखर खाल्ल्यामुळे आतड्यांतील चांगल्या-वाईट जीवाणूंचे संतुलन बिघडू शकते मग या असंतुलनामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटणे आणि पचनाशी संबंधित त्रास आदी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (Photo : Freepik)

  • 6/9

    मल्होत्रा यांनी साखरेचे सेवन कमी करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे : (Photo : Freepik)

  • 7/9

    फूड लेबल वाचा
    अन्नपदार्थावर असलेले फूड लेबल नीट वाचा. त्यात किती साखर वापरली आहे, हे लक्षात घ्या. अमेरिकन हॉर्ट असोसिएशनने सुचविल्याप्रमाणे दररोज पुरुषांनी ३७.५ ग्रॅम आणि स्त्रियांनी २५ ग्रॅम यापेक्षा अधिक साखर खाऊ नये. (Photo : Freepik)

  • 8/9

    गोड पदार्थ खाणे टाळावे
    ब्राउन शुगर, कॉर्न सिरप, मध इत्यादी प्रकारचे गोड पदार्थ खाणे टाळावे. (Photo : Freepik)

  • 9/9

    सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांना महत्त्व द्यावे
    फळे, भाजीपाला, कडधान्ये, असे सर्व प्रकारचे अन्नपदार्थ खावेत. प्रोटीनयुक्त पदार्थ खावेत. हे पदार्थ पौष्टिक असतात आणि त्याचबरोबर तुमची भूकही भागवतात. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Sugar intake how to find out that you eat excessive amounts of sugar or not ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.