Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. superfoods including green vegetables are good for blood health healthy lifestyle ndj

हिरव्या पालेभाज्यांसह हे सुपरफूड्स ठरतील रक्त शुद्ध व निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर

Superfoods are good for blood health : काही असे सुपरफूड्स आहेत, जे नैसर्गिक औषधाचे कार्य करतात आणि आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटक प्रदान करतात.

August 13, 2024 20:33 IST
Follow Us
  • superfoods
    1/9

    शरीर निरोगी राहण्यासाठी शरीरातील रक्त शुद्ध व चांगले राहणे महत्त्वाचे आहे. काही असे सुपरफूड्स आहेत, जे नैसर्गिक औषधाचे कार्य करतात आणि आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटक प्रदान करतात. (Photo : Freepik)

  • 2/9

    हे पोषक घटक आपल्या शरीरातील रक्त व संपूर्ण आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. (Photo : Freepik)

  • 3/9

    दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना हैदराबादच्या बंजारा हिल्स येथील केअर हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जी. सुषमा यांनी पाच सुपरफूड्स सांगितले आहेत, ज्यांचा रक्ताच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात समावेश केला पाहिजे. (Photo : Freepik)

  • 4/9

    हिरव्या पालेभाज्या
    पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या सॅलड तयार करण्यासाठी फायदेशीर आहेत. पण त्याचबरोबर त्यातील लोह या घटकामुळे शरीरातील रक्ताची उणीव दूर होते, असे जी. सुषमा सांगतात. या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के असते, जे रक्त गोठण्यापासून वाचवते आणि हाडे मजबूत ठेवते. (Photo : Freepik)

  • 5/9

    बेरी
    रासबेरी, ब्ल्यूबेरी व स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात; जे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारतात, रक्तदाब कमी करतात. त्यामुळे आपले कोलेस्ट्रॉल नेहमी तपासत राहा. (Photo : Freepik)

  • 6/9

    मासे
    सॅल्मन, मॅकरेल व सार्डिन हे मासे अत्यंत चविष्ट असतात. त्याचबरोबर हृदयाच्या आरोग्यासाठीही ते तितकेच फायदेशीर असतात. ओमेगा -३ फॅटी अॅसिडने समृद्ध असलेले हे मासे जळजळ आणि शरीरास हानिकारक असलेले फॅट्स कमी करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करता येतो. (Photo : Freepik)

  • 7/9

    सुका मेवा आणि बिया
    सुका मेवा आणि बिया शरीरास ऊर्जा प्रदान करतात. बदाम, चिया सीड्स व जवस हे पदार्थ फक्त स्नॅकसाठीच उपयुक्त नाहीत, तर ते पौष्टिक पदार्थसुद्धा आहेत; जे शरीरास ऊर्जापुरवठाही देतात. त्यात निरोगी फॅट्स, फायबर व प्रोटीन्स असतात; जे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याशिवाय सुका मेवा आणि बिया मॅग्नेशियमचा एक उत्तम स्रोत आहे; ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. (Photo : Freepik)

  • 8/9

    बीट
    बीटमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते; ज्याचे शरीरात गेल्यावर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होते. नायट्रिक ऑक्साइड हा घटक रक्तवाहिन्यांना आराम देतो आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुधारून, रक्तदाब कमी होतो. बीटमध्ये फोलेट व बीटेनदेखील असतात, जे रक्तवाहिन्याशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात. (Photo : Freepik)

  • 9/9

    या वरील सुपरफूड्सचा तुम्ही आहारात समावेश करून निरोगी जीवनशैली अंगीकारू शकता; ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत मिळेल. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Superfoods including green vegetables are good for blood health healthy lifestyle ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.