-
भारतीय आहारात पोळी हा एक मुख्य पदार्थ आहे. तुम्ही भाजी, वरण, चटणी, ठेचा आदी बऱ्याच पदार्थांबरोबर खाऊ शकता.(फोटो सौजन्य: Freepik)
-
पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, तुमच्या गव्हाच्या पिठाच्या पोळीला उत्तम, आरोग्यदायी बनविण्याचा आणखीन एक पर्याय आमच्याकडे आहे. तर तुमचा विश्वास बसेल का? हो… तर तुमच्या गव्हाच्या पिठात सातू व ज्वारी यांचे मिश्रण हा तुमच्यासाठी जेवणाचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.(फोटो सौजन्य: Freepik)
-
बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ताने आई होणार असल्याची गोड बातमी शेअर केली होती. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम / @masabagupta)
-
तर काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो सुद्धा शेअर केला होता. त्यामध्ये ती दुपारच्या जेवणात सातू व ज्वारीचे मिश्रण असणारी पोळी, मेथी चिकन, वांग्याचे भरीत, बूंदी रायता आदी पदार्थांचे सेवन करताना दिसली. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम / @masabagupta)
-
तर सातू व ज्वारीचे मिश्रण असणारी पोळी खरोखरच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने मुंबई येथील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या क्लिनिकल आहारतज्ज्ञ वेदिका प्रेमानी यांच्याबरोबर चर्चा केली. (फोटो सौजन्य: Freepik)
-
गव्हाच्या पोळीपेक्षा सातू, ज्वारी यांच्या मिश्रणाची पोळी हा आरोग्यदायी पर्याय आहे. सातू हा हरभरा म्हणजेच चण्यापासून बनवला जातो; जो ज्वारी, बाजरीबरोबर मिक्स करून खाल्ला जाऊ शकतो. सातू , ज्वारीची पोळी हा प्रथिनांचा चांगला स्रोत ठरतो.(फोटो सौजन्य: Freepik / इन्स्टाग्राम / @masabagupta)
-
सातूचे आरोग्यदायी फायदे: आहारातील फायबर, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आदी खनिजांनी समृद्ध आहे. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास, स्नायूंची ताकद सुधारण्यास, प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि हाडांच्या बळकटीलादेखील मदत होते.(फोटो सौजन्य: Freepik)
-
ज्वारीचे आरोग्यदायी फायदे : ग्लुटेनमुक्त असलेले बाजरी, ज्वारी ही धान्ये फायबरनी समृद्ध आहेत. तसेच सातू हे धान्य रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी, हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी तर रोगप्रतिकारशक्ती आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासही मदत होते. हे पोटॅशियम, फॉस्फरस यांसारख्या खनिजांनीही समृद्ध आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
या संयोजनाशी संबंधित कोणते आरोग्य धोके उदभवू शकतात का? उत्तर : नाही… जर आहारातील फायबरचे इतर स्रोत जसे की, भाज्या किंवा इतर डाळी एकत्र केल्या तरीही त्याने बद्धकोष्ठता होऊ शकत नाही. तसेच हे संयोजन तुमच्या नियमित आहाराचा एक फायदेशीर भाग होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
सातू, ज्वारीच्या मिश्रणाची पोळी ‘हा’ आरोग्यदायी पर्याय आहे का? बद्धकोष्ठता होईल दूर, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल; जाणून घ्या डॉक्टरांचे मत
health benefits of sattu and jowar : तसेच सातू हे धान्य रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी, हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. तर ज्वारी…
Web Title: What are the health benefits of sattu and jowar masaba gupta loves to it sattu jowar rotis eat for lunch option asp