Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. ukadiche modak recipe ganesh chaturthi 2024 homemade modak recipe ganpati bappa favourite naivedya jshd import dvr

Ukadiche Modak Recipe: बाप्पा तुला गोड गोड मोदक घे! गणेशोत्सवात करा बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक; रेसिपी लगेच नोट करा

Modak Recipe: गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोदकांचं नैवेद्य दाखवणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे घरच्याघरी कसे मोदक कराल, याची रेसिपी आज पाहा

Updated: September 7, 2024 11:31 IST
Follow Us
  • Ganesh Chaturthi 2024
    1/8

    ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. हा १० दिवसांचा उत्सव दरवर्षी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणपती बाप्पाचा हा सण लोक विविध प्रकारे लोक साजरा करतात, परंतु बाप्पाच्या आवडत्या प्रसादाशिवाय हा सण अपुरा मानला जातो. (एएनआय फोटो)

  • 2/8

    या दिवशी खास गणपती बाप्पासाठी अनेक प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो. परंतु, बाप्पाच्या आवडीचा मोदक घरोघरी अगदी आवर्जून केला जातो. (फोटो स्त्रोत: फ्रीपिक)

  • 3/8

    बाप्पाचे हे आवडते मोदक बनवणे खरंतर खूप सोपे आहे. त्यामुळे या गणेशोत्सवात तुम्हीही खाली दिलेल्या रेसिपीने हे मोदक घरच्या घरी सहज घरी बनवू शकता. (फोटो स्त्रोत: फ्रीपिक)

  • 4/8

    पारंपारिक उकडीचे मोदक बनवण्यासाठी तुम्हाला १ कप तांदळाचे पीठ, १ कप किसलेले खोबरे, १/२ कप किसलेला गूळ, २ टीस्पून साजूक तूप, २ टीस्पून बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स आणि १/२ टीस्पून वेलची पूड लागेल.  (Photo Created by Bing AI Image Creator)

  • 5/8

    मोदक बनवण्यासाठी आधी सारण तयार करा. यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात एक चमचा तूप घालून किसलेले खोबरे हलके भाजून घ्या. यानंतर त्यात गूळ घालून मिक्स करा.  (Photo Created by Bing AI Image Creator)

  • 6/8

    आता हे मिश्रण मंद आचेवर भाजून घ्या आणि त्यात वेलचीही घाला. गूळ आणि खोबरं चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर गॅस बंद करा आणि मिश्रण वेगळ्या भांड्यात काढा. आता त्यात चिरलेले ड्रायफ्रूट्स मिक्स करा. मोदकाचे सारण तयार आहे. (Photo Created by Bing AI Image Creator)

  • 7/8

    आता एका कढईत १ कप पाणी गरम करून घ्या. त्यात एक चमचा तूप घाला. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून मिक्स करा. तांदळाचे पीठ अर्धे शिजल्यावर ताटात काढून थोडे थंड झाल्यावर हाताला तूप लावून मळून घ्या. (Photo Created by Bing AI Image Creator)

  • 8/8

    आता पिठाचा एक छोटा गोळा घेऊन त्याला दाबून मधोमध एक जागा बनवा आणि नंतर त्यात खोबऱ्याचे सारण भरून चांगले बंद करून मोदकाचा आकार द्या. आपण यासाठी मोल्डदेखील वापरू शकता. असे मोदक तयार करून १५-२० मिनिटे वाफवा. गणपती बाप्पाचा आवडता मोदक तयार आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे मोदक केशरने सजवू शकता. (Photo Created by Bing AI Image Creator)

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryरेसिपीRecipeलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Ukadiche modak recipe ganesh chaturthi 2024 homemade modak recipe ganpati bappa favourite naivedya jshd import dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.