• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you want to change jobs frequently these could be the reasons for leaving jobs ndj

वारंवार नोकरी बदलण्याची इच्छा होते? ही असू शकतात कारणे

वारंवार नोकरी बदलण्यामागील काही कारणे जाणून घेऊ या.

September 21, 2024 17:37 IST
Follow Us
  • Reasons for Leaving jobs frequently
    1/9

    अनेक जण वारंवार नोकरी बदलतात पण सतत नोकरी बदलल्याने आपल्या विश्वासाहर्तेवर आणि प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. (Photo : Freepik)

  • 2/9

    कामात बदल करणे, हे वाईट नाही पण वारंवार नोकरी बदलल्यामुळे आपली प्रोफाइल खराब होते. (Photo : Freepik)

  • 3/9

    ९ ते ५ जॉब करणे, काम करण्याचा कंटाळा येणे, असे प्रत्येकाबरोबर घडते पण त्यासाठी वारंवार नोकरी बदलणे खरंच गरजेचे आहे का? याविषयी विचार करणे गरजेचे आहे. (Photo : Freepik)

  • 4/9

    वारंवार नोकरी बदलण्यामागील काही कारणे जाणून घेऊ या. (Photo : Freepik)

  • 5/9

    कामावर लक्ष केंद्रीत करता येत नाही
    आपल्या आजुबाजूला अनेक गोष्टी घडत असतात अशावेळी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करणे, हे खूप मोठे आव्हान असते. आपल्यापैकी अनेक लोक फक्त १५ मिनिटांसाठी एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करू शकतात. दिवसाचे आठ तास एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे खूप कठीण जाते. जे तुम्ही काम करता, त्यात तुम्हाला स्वारस्य नसते त्यामुळे आधी स्वत:ला विचारा की तुम्हाला स्वत:ला काय पाहिजे आणि त्यावर लक्ष केंद्रीत करा. (Photo : Freepik)

  • 6/9

    नवीन गोष्ट करण्याची संधी मिळत नाही
    तुम्हाला कामाच्या ठिकाणी गुदमरल्यासारखे वाटते. तुमचे काम तुम्हाला उत्साही करत नाही. एकच एक काम नियमित करत असल्यामुळे तुम्हाला नवीन गोष्ट करण्याची संधी मिळत नाही. (Photo : Freepik)

  • 7/9

    तुम्हाला कामाचा कंटाळा येतो
    ज्या लोकांचे ध्येय त्यांच्या कामापेक्षा मोठे असते त्यांना कामाचा लवकर कंटाळा येतो. ते कोणतीही गोष्ट लवकर शिकतात आणि त्यामुळे त्यांचे त्यातून खूप लवकर स्वारस्य संपते. त्यांना नवीन आव्हाने स्वीकारायची असतात पण त्यांना संधी मिळत नाही ज्यामुळे ते निराश होता आणि प्रयत्न कमी करतात. (Photo : Freepik)

  • 8/9

    पगाराबाबत समाधानी नाही
    नोकरी सोडण्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे पगार. नोकरीमध्ये अनेक आव्हाने असली तरी चालेल पण पगार चांगला असला पाहिजे. तुम्ही आणि तुमचा सहकारी समान काम करतो पण त्याला तुमच्यापेक्षा जास्त पगार असल्यावर तुम्हाला काय वाटेल? कंपनीने तुम्हाला फसवले, असे वाटू शकते किंवा तुम्ही पगारापेक्षा जास्त काम करता, म्हणून कामामध्ये आळशीपणा करू शकता. (Photo : Freepik)

  • 9/9

    तुम्हाला तुमच्या कामाविषयी आवड नाही
    कामाविषयी आवड असणे, ही एक अशी एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला काम करण्यास प्रेरित ठेवते. तुमची आवड शोधणे हे सर्वात मोठे आव्हान आहे पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कौशल्ये वापरता येणारी नोकरी कराल तेव्हा तुम्हाला ती नोकरी कधीही सोडायची इच्छा होणार नाही . त्यामुळे तुमचे ध्येय निश्चित करा आणि काम करा. तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही. (Photo : Freepik)

TOPICS
करिअरCareerजॉबJob

Web Title: Do you want to change jobs frequently these could be the reasons for leaving jobs ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.