-
तुम्ही आजवर तुपापासून बनवलेले अनेक पदार्थ खाल्ले असतील. हल्ली तुपापासून बनवल्या जाणाऱ्या कॉफीचेसुद्धा सर्वांना वेड लागले आहे. कारण वजन कमी करण्यासाठी तुपापासून तयार केलेली कॉफी फायदेशीर ठरू शकते. आता तुपाच्या कॉफीबरोबर तुपाचा चहासुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे समोर येत आहे. (Photo : Freepik)
-
आतड्यांच्या आरोग्यासाठी, मासिक पाळीदरम्यान आराम मिळावा म्हणून आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी तुपाचा चहा सुपरफूड म्हणून काम करतो. चहामध्ये एक चमचा तूप घालण्याचा सल्ला अनेक सोशल मीडिया पोस्टमधून करण्यात आला आहे. (Photo : Freepik)
-
तुपापासून बनवला जाणारा चहा हा चहा आणि तुपाचे मिश्रण असते. “चहाच्या कपमध्ये एक चमचा तूप टाकावे. तुपामध्ये चांगले फॅट्स, जीवनसत्त्वे आणि इतर फायदेशीर संयुगे (compounds) असतात, तसेच चहामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे अनेक आरोग्याच्या समस्या दूर करतात. तूप आणि चहाचे एकत्रित मिश्रण हे आरोग्यास फायदेशीर पेय तयार करते, जे पचनाशी संबंधित आरोग्याच्या समस्या आणि संपूर्ण आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करते”, असे न्यूट्रिशनिस्ट डॉ. रोहिणी पाटील सांगतात. (Photo : Freepik)
-
पाटील पुढे सांगतात, “जेव्हा चहामध्ये तूप टाकले जाते तेव्हा त्यातील गुणधर्म बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यास फायदेशीर ठरू शकतात” (Photo : Freepik)
-
डॉ. पाटील यांच्या मते, तुपामध्ये ब्युटीरेट एक शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड असते, जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. (Photo : Freepik)
-
तुपामध्ये याशिवाय अँटिऑक्सिडंट्स असतात, जे मासिक पाळीदरम्यानच्या वेदना कमी करतात. (Photo : Freepik)
-
तुपामध्ये कॅलरीज आणि फॅट्स भरपूर असतात, त्यामुळे त्याचा आस्वाद घेताना कॅलरीजवर नियंत्रण ठेवा.
तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी आहे का, याची खात्री करा. तुपाचा चहा घेण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्या. (Photo : Freepik) -
जर तुम्हाला दीर्घकालीन बद्धकोष्ठतेची समस्या जाणवत असेल किंवा मासिक पाळीदरम्यान वेदना जाणवत असतील तर आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (Photo : Freepik)
-
तुपाचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, पण त्याबरोबरच वैद्यकीय उपचार आणि तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या, असे डॉ. पाटील सांगतात. (Photo : Freepik)
खरंच तुपाचा चहा आहे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या
आतड्यांच्या आरोग्यासाठी, मासिक पाळीदरम्यान आराम मिळावा म्हणून आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी तुपाचा चहा सुपरफूड म्हणून काम करतो.
Web Title: Really ghee tea is good for health know benefits of ghee tea ndj