-
सफरचंद (Apple) शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. सफरचंद फायबरने(fibre) भरपूर आहे, विशेषतः त्यामधील पेक्टिन (Pectin), जे पचनक्रिया(Digestive system) योग्य रित्या पार पडण्यास मदत करते. (Photo: Pexels)
-
विद्राव्य फायबर (Soluble fibre)योग्य पचनक्रिया होण्यास तसेच पोषक घटक (Nutrient content) शोषण्यास मदत करते. अद्राव्य फायबर(Insoluble fibre) बद्धकोष्ठतेच्या (Constipation) त्रासापासून आराम देते तसेच आतड्याच्या हालचाललींमध्ये कोणतीही बाधा(Bowel movements) टाळण्यास मदत करते. (Photo: Pexels)
-
सफरचंदामध्ये असलेल्या हाय फायबरमुळे शरीरातील शक्ती सबंध दिवस उत्स्फूर्त राहून भुकेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. (Photo: Pexels)
-
या फळामध्ये कमी कॅलरी आणि पाण्याचे अंश अधिक असल्यामुळे वजन घटवण्यासाठी सुद्धा सफरचंद एक उत्तम पर्याय असू शकतो. (Photo: Pexels)
-
विद्राव्य फायबर असल्यामुळे सफरचंद आतड्यांमध्ये असलेल्या कोलेस्ट्रॉलचे (Cholesterol) प्रमाण आटोक्यात आणण्यास मदत करते. (Photo: Pexels)
-
या फळामध्ये कमी कॅलरी(Calorie) आणि पाण्याचे अंश (Water content) अधिक असल्यामुळे वजन घटवण्यासाठी (Weight loss) सुद्धा सफरचंद एक उत्तम पर्याय असू शकतो. (Photo: Pexels)
-
फ्लेव्होनॉइड्ससारख्या(Flavonoids) अँटिऑक्सिडेंट्सचा(Antioxidants) समावेश असल्यामुळे सफरचंद रक्तवाहिनी प्रक्रिया (Blood vessels function)सुधारत ब्लड प्रेशर (Blood pressure) कमी करून हृदयाचे विकार आटोक्यात आणण्यास मदत करते.
(अँटिऑक्सिडेंट्स- शरीरात अनेक प्रक्रिया सुरु असतात. यावेळी अनेक धोकादायक अणूंचा सामना करणारे अँटिऑक्सिडेंट्स असतात.) (Photo: Pexels)
-
तज्ञांच्या अभ्यासानुसार, सफरचंदाचा नियमित आहार पाळल्याने अल्झायमर(Alzheimer) आणि पार्किन्सन (Parkinson’s)रोग यांसारख्या मेंदूच्या आजारांचा धोका काही प्रमाणात कमी करण्यास मदत होते. (Photo: Pexels)
-
सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) चा समावेश आहे ज्याचा उपयोग रोगप्रतिकारक प्रणाली (Immune system) किंवा इम्म्युन सिस्टिमला मजबूत ठेवण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्त पेशींच्या (White blood cells) उत्पादनात वाढ होण्यास मदत करते ज्यामुळे शरीराला कुठल्याही इन्फेक्शनशी (Infection)लढण्यात ताकद मिळते. (Photo: Pexels)
-
यात असलेल्या अँटिऑक्सिडेन्ट आणि विटॅमिन सीमुळे त्वचेचे आरोग्य जपण्यात मदत होते.
व्हिटॅमिन सी कोलेजनच्या उत्पादनात मदत करते ज्याचा उपयोग त्वचेच्या लवचिकतेसाठी(Skin elasticity) व जखम भरण्यासाठी होतो. (Photo: Pexels)
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक)