• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. are monk fruit sweeteners safe for you read what expert said asp

माँक फ्रूट तुमचा मित्र आहे की शत्रू? अतिसेवनाचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात का? वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात…

monk fruit increase risk of heart problems : साखरेला पर्याय म्हणून हे फळ एक आरोग्यदायी पर्याय मानला जातो. पण, या गोड फळाच्या सेवनाने अनेकदा आरोग्याच्या धोक्यांबद्दलचे प्रश्न उद्भवतात…

November 8, 2024 20:31 IST
Follow Us
  • monk fruit sweetener is a friend or foe
    1/9

    आरोग्य तज्ज्ञ व वेलनेस एन्थुसिअस्ट्स यांनी साखरेचे सेवन करण्याच्या नकारात्मक बाजूंवर भर दिला आहे. तसेच साखरेला पर्याय म्हणून बाजारात उपलब्ध असलेले सर्व पर्याय आपल्यासाठी सुरक्षित आहेत का यावरसुद्धा आपण विचार केला पाहिजे असं सांगितलं आहे . तर यापैकी एक पर्याय म्हणजे माँक फ्रूट (Monk Fruit). (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 2/9

    साखरेला पर्याय म्हणून हे फळ एक आरोग्यदायी पर्याय मानला जातो. पण, या गोड फळाच्या सेवनाने अनेकदा आरोग्याच्या धोक्यांबद्दलचे प्रश्न उद्भवतात. तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने आहारतज्ज्ञ प्रीती श्रीवास्तव यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान माँक फ्रूट मित्र आहे की शत्रू हे त्यांनी समजावून सांगितले. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 3/9

    माँक फ्रूटच्या पावडरचा स्टीव्हियाप्रमाणेच स्वीटनर म्हणूनही वापर करतात. माँक फ्रूट म्हणजे एक लहान, हिरव्या रंगाचा खरबुज; जो मूळात चीनमधून आला आहे. या फळामध्ये असणारा गोडवा म्हणजे मोग्रोसाइड्स, जो साखरेपेक्षा १५०-२५० पेक्षा जास्त गोड असतो. माँक फ्रूटची पावडर म्हणजे फ्रूट स्वीटनर हे आरोग्यासाठी सुरक्षित मानले जाते आणि एफडीएने दिलेल्या GRAS कॅटेगरीमध्ये ते येते. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 4/9

    माँक फ्रूटच्या पावडरचे फ्रूट स्वीटनर म्हणून सेवन करणे सुरक्षित असले तरीही माँक फ्रूटच्या पावडरच्या जास्त सेवनाने ॲलर्जी, पाचन अस्वस्थता आदी परिणामदेखील संभवतात, असे आहारतज्ज्ञ प्रीती श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 5/9

    माँक फ्रूट पावडर हे नवीन स्वीटनर आहे आणि दीर्घकालीन वापरासाठी त्यावर अजूनही अभ्यास चालू आहे. माँक फ्रूटच्या सुरक्षित वापराचा जो अभ्यास करण्यात आला आहे, तो प्राण्यांवर करण्यात आला आहे. परंतु, माँक फ्रूटचा लहान मुले, गरोदर महिला यांच्या पचनक्रियेवर होणाऱ्या परिणामांबाबत फारच कमी किंवा कोणताही अभ्यास झालेला नाही. त्यामुळे लहान मुले, गरोदर महिलांनी माँक फ्रूटचे मर्यादित प्रमाणातच सेवन केले पाहिजे, असे आहारतज्ज्ञ प्रीती श्रीवास्तव म्हणाल्या आहेत. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 6/9

    माँक फ्रूट हे फरमेंटेबल करण्यायोग्य नसल्यामुळे एरिथ्रिटॉलसारख्या इतर साखर अल्कोहोलच्या तुलनेत ते गॅस्ट्रोइंटेस्टायनलमध्ये व्यत्यय आणत नाही. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 7/9

    अभ्यासानुसार या शुगर अल्कोहोलचे जास्त सेवन हृदयविकाराशी निगडित समस्यांना आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे माँक फ्रूट स्वीटनर खरेदी करताना एरिथ्रिटॉलचा समावेश नसलेले आणि एक्स्ट्रॅक्ट (अर्क) असलेले स्वीटनर खरेदी करण्याचा पर्याय तज्ज्ञांनी सुचवला आहे. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 8/9

    चाइल्ड हार्ट फाऊंडेशनचे संस्थापक डॉक्टर विकास कोहली यांनी, “माँक फ्रूट स्वीटनरचा समावेश असलेल्या नॉन-शुगर स्वीटनरचा (NSS) दीर्घकालीन वापर करण्यामुळे टाईप २ मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग अन् मृत्यूचा धोका वाढू शकतो. त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी करून, फळे, भाज्या यांसारखे नैसर्गिक शर्करा असलेले अधिक अन्नपदार्थ समाविष्ट केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास हातभार लागतो“, असे आवर्जून सांगितले आहे. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 9/9

    आहारतज्ज्ञ प्रीती श्रीवास्तव यांनी, “फळे, सुका मेवा, संपूर्ण अन्नातून नैसर्गिक गोडवा मिळवणे नेहमीच अधिक आरोग्यदायी ठरू शकते. पण, तुम्हाला काहीतरी गोड खायचं असेल, तर तुम्ही खजुराचे सरबत किंवा पावडर, मनुका सरबत, स्टीव्हिया किंवा माँक फ्रूट एक्स्ट्रॅक्ट हे पर्याय निवडू शकता. दही किंवा भाज्यांचे सॅलड गोड करण्यासाठी साखर घालण्याऐवजी त्यात फळे वापरा“, असे सांगितले. (फोटो सौजन्य : @Freepik)

TOPICS
हेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefits

Web Title: Are monk fruit sweeteners safe for you read what expert said asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.