• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. is really onion juice better for health read onion juice benefits ndj

Onion Juice : खरंच कांद्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

Onion Juice : द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने कांद्याचा रस पिण्याचे फायदे जाणून घेतले

January 15, 2025 09:27 IST
Follow Us
  • Onion Juice
    1/9

    लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिला कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतेच कुशा कपिलाने आरोग्याविषयी बोलताना पोटदुखीवर त्वरित आराम कसा मिळवायचा, याविषयी घरगुती उपाय सांगितला आहे. (Photo : Freepik)

  • 2/9

    कुशा कपिला ही मीरा कपूर, नीतू कपूर आणि अथिया शेट्टी यांच्याशी संवाद साधताना सांगते, “जेव्हा तुम्हाला पोटदुखीचा त्रास उद्भवतो तेव्हा कांद्याचा रस फायद्याचा ठरतो. लहानपणी आई मला कांद्याचा रस प्यायला द्यायची.” (Photo : Freepik)

  • 3/9

    कपिलाने सांगितल्याप्रमाणे, एक कांदा घ्या आणि त्याचा रस काढा आणि प्या. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने कांद्याचा रस पिण्याचे फायदे जाणून घेतले. (Photo : Freepik)

  • 4/9

    कांद्याच्या रसाचे फायदे
    हैदराबाद येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सच्या क्रिटिकल केअर विभागाचे प्रमुख आणि सल्लागार डॉ. मनेंद्र सांगतात, “कांद्याचा रस पोटदुखीसह विविध आजारांवर दीर्घ काळापासून घरगुती उपचार म्हणून वापरला जातो.” (Photo : Freepik)

  • 5/9

    मनेंद्र सांगतात, “कांद्याच्या रसामध्ये सल्फर, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स आहेत, ज्यात आरोग्यासाठी फायदेशीर असे गुणधर्म आहेत. कांद्याचा रस अपचन किंवा सौम्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल संसर्गामुळे होणारा पोटाचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतो.” (Photo : Freepik)

  • 6/9

    त्यांनी निदर्शनास आणले की, पोटदुखीसाठी कांद्याचा रस फायदेशीर असल्याचे वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत. (Photo : Freepik)

  • 7/9

    ते पुढे सांगतात, “अति संवेदनशील पोट किंवा ॲसिड रिफ्लक्स (पचनाशी संबंधित आजार) सारख्या परिस्थितीमध्ये कच्च्या कांद्याचा रस खाल्ल्याने लक्षणे वाढू शकतात, ज्यामुळे छातीत जळजळ किंवा चिडचिड होऊ शकते”, असे डॉ. मनेंद्र सांगतात. (Photo : Freepik)

  • 8/9

    असे उपाय करण्यापूर्वी पोटदुखीचे मूळ कारण ओळखणे महत्त्वाचे आहे – मग ते गॅस, पोट फुगणे, संसर्ग किंवा कोणत्याही पोटाशी संबंधित गंभीर समस्यांमुळे पोटदुखी उद्भवू शकते. (Photo : Freepik)

  • 9/9

    “पोटदुखीदरम्यान हायड्रेशन, विश्रांती आणि गरज भासल्यास ओव्हर-द-काउंटर औषधे (नॉन-प्रिस्क्रिप्शनशिवाय घेतलेली औषधी) घेऊ शकता”, असे डॉ. मनेंद्र सांगतात. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefits

Web Title: Is really onion juice better for health read onion juice benefits ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.