• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. randeep hoodas 18kg weight loss in 28 days is long term fasting safe read long term fastings health risks ndj

रणदीप हुड्डाने केले २८ दिवसांमध्ये १८ किलो वजन कमी; खरंच जास्त वेळ उपवास करणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे का?

Randeep Hooda weight Loss : “मी २८ दिवसांमध्ये १८ किलो वजन कमी केले, हे एक कठोर पाऊल होते. मी खाणे पिणे सोडले, त्यामुळे वजन लवकर कमी झाले. दीड वर्ष माझे वजन कमी होते,” असे डिजिटल क्रिएटर शुभंकर मिश्राबरोबर बोलताना रणदीपने सांगितले.

April 27, 2025 17:08 IST
Follow Us
  • Randeep Hooda weight Loss
    1/12

    बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. नुकतेच त्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित बायोपिक चित्रपटामध्ये काम केले. त्यासाठी त्याला वजन कमी करावे लागले. याविषयी रणदीप सांगतो की, एका क्लायमॅक्स सीनसाठी त्याने २८ दिवसांमध्ये १८ किलो वजन कमी केले. “मी २८ दिवसांमध्ये १८ किलो वजन कमी केले, हे एक कठोर पाऊल होते. मी खाणे पिणे सोडले, त्यामुळे वजन लवकर कमी झाले. दीड वर्ष माझे वजन कमी होते,” असे डिजिटल क्रिएटर शुभंकर मिश्राबरोबर बोलताना रणदीपने सांगितले. (Photo : Randeep Hooda/Instagram)

  • 2/12

    वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना तुम्ही असेच वजन कमी करण्याचा सल्ला द्याल का, असे रणदीपला जेव्हा विचारले तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला, “वजन कमी करण्यासाठी आणि चांगले दिसण्यासाठी उपवास हा एक उत्तम मार्ग आहे. उपवासापेक्षा चांगले काहीही नाही. संपूर्ण आयुष्यात आपली पचनसंस्था सतत काम करते आणि अनेकदा पोटाच्या किंवा आतड्यांशी संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवतात. जेव्हा तुम्ही काही उपवास करता, तेव्हा पोटाला किंवा आतड्यांना आराम मिळतो. उपवास आपल्याला जास्त ऊर्जा देते. ही ऊर्जा जेवल्यानंतर मिळालेल्या ऊर्जेपेक्षा जास्त असते. (Photo : Randeep Hooda/Instagram)तुम्ही काहीही खाल्ले नाही तरी तुम्हाला सक्रिय ठेवते, त्यामुळे तुम्ही १-२ दिवस उपवास ठेवू शकता.”

  • 3/12

    रणदीप सांगतो की, “उपवास करताना आपण काय खातो किंवा काय नाही याची काळजी घेतली पाहिजे, तुम्ही काहीही खाऊ नका.पाणी, ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी पिऊ नका. लिंबू पाणी, नारळ पाणी पिऊ नका. तुम्ही जितका जास्त वेळ उपवास ठेवू शकता तितके ते तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या दिसण्यासाठी असते.” (Photo : Randeep Hooda/Instagram)

  • 4/12

    याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली. रणदीपच्या विधानावरून उपवासाविषयी असलेली लोकांची सामान्य समज दिसून येते. पण, याविषयी सावधगिरी बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे क्लिनिकल आहारतज्ज्ञ गरिमा गोयल सांगतात. (Photo : Randeep Hooda/Instagram)

  • 5/12

    खरं काय?
    उपवासामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो. अधून मधून (१४-१६ तास) उपवास केल्याने आतड्यांच्या आरोग्यास फायदा मिळू शकतो. छातीतील जळजळ कमी होऊ शकते आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकते. कमी कालावधीसाठी केलेल्या उपवासामुळे सतर्कता सुधारू शकते. काही लोकांना उपवास केल्यानंतर उत्साही वाटते, कारण पचनक्रियेसाठी आवश्यक असलेली ऊर्जा साठवलेली असते, तसेच उपवास करताना नॉरपेनेफ्रिन (norepinephrine) सारखे हार्मोन्स वाढू शकतात. (Photo : Freepik)

  • 6/12

    उपवास करताना काय काळजी घ्यावी?
    “तुम्ही जितके जास्त वेळ उपवास कराल तितके चांगले आहे.” प्रत्येकाला हे लागू होत नाही, असे गोयल सांगतात.
    जास्त काळ उपवास (२४-४८ तास) शरीरावर ताण येऊ शकतो. विशेषत: महिलांवर याचा जास्त परिणाम दिसून येतो. (Photo : Freepik)

  • 7/12

    हार्मोनल असंतुलन असलेल्या (उदा., PCOS, थायरॉइड), मधुमेह किंवा कमी रक्तदाब असलेले लोक, ज्यांना खाण्याशी संबंधित आजार आहे तसेच गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांना दीर्घकाळाच्या उपवासाचे नकारात्मक परिणाम दिसू शकतात. (Photo : Freepik)

  • 8/12

    ब्लॅक कॉफी, चहा, लिंबू आणि नारळ पाणीचे सेवन
    “रणदीप ड्राय उपवासाला प्रोत्साहन देतो. (कॅलरीज अजिबात नाहीत), पण हे सर्वांसाठी फायदेशीर नाही,” असे गोयल सांगतात.
    उपवासादरम्यान लिंबू किंवा नारळ पाणी उपयुक्त ठरू शकते. (Photo : Freepik)

  • 9/12

    जर लोक मार्गदर्शनाशिवाय फक्त पाणी पित दीर्घकाळ उपवास करत असतील तर इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि निर्जलीकरणचा धोका वाढू शकतो. फक्त दिखाव्यासाठी उपवास करणे समस्यांना निमंत्रण आहे, असे गोयल सांगतात. (Photo : Freepik)

  • 10/12

    गोयल यांच्या मते, “उत्तम दिसणे म्हणजे तुम्ही निरोगी असणे असे नाही. उपवास केल्याने काही लोकांना हलके वाटू शकते, परंतु जर तुम्ही उपवास जाणीवपूर्वक केला नाही तर थकवा, पोषक तत्वांची कमतरता तसेच स्नायूंच्या समस्यासुद्धा वाढू शकतात”, असे गोयल पुढे सांगतात. (Photo : Freepik)

  • 11/12

    उपवास करून कसे वजन कमी करायचे ?
    सुरुवात ४८ तासांच्या उपवासाने नव्हे तर हळूहळू (१२-१४ तास) उपवासाने करा.
    तुमच्या शरीराचे ऐका. चक्कर येणे, थकवा आणि चिडचिड हे धोक्याचे संकेत असू शकतात.
    प्रत्येकाने उपवास करू नये, विशेषतः आरोग्याच्या समस्या असलेल्यांनी उपवास करणे टाळावे. (Photo : Freepik)

  • 12/12

    उपवास करताना योग्य पोषण, हायड्रेशन आणि निरोगी जीवनशैलीकडे लक्ष द्यावे. वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय म्हणून उपवास करू नये, असे गोयल सांगतात. (Photo : Freepik)

TOPICS
उपवास
डाएट
Diet
डाएट टिप्स
Diet Tips
फूड
Food
लाइफस्टाइल
Lifestyle
हेल्दी लाइफस्टाइल
Healthy Lifestyle
+ 2 More

Web Title: Randeep hoodas 18kg weight loss in 28 days is long term fasting safe read long term fastings health risks ndj

IndianExpress
  • Iran-Israel Ceasefire LIVE | May sign deal: Trump says US, Iranian officials will talk next week
  • 2 killed, over 10 missing in Kangra, Kullu as cloudbursts trigger flash floods in Himachal Pradesh
  • Raja Raghuvanshi murder: Police recover pistol from Raj’s home, search on for Sonam’s laptop
  • ‘Papa, kar ke aata hoon, chinta na karo’: Shubhanshu Shukla’s message to parents before Axiom-4 liftoff
  • Suspected thief tied to police vehicle in Jammu, Mirwaiz asks: ‘Is this how Kashmiris will be treated in their own land?’
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us